राष्ट्रवादीत मीठाचा खडा टाकणारा शकुनी टरबुज्याच्या आकाराचा की कमळाच्या आकाराचा; कोल्हेंचा हल्लाबोल

Amol Kolhe On BJP: अजित पवारच्या (Ajit Pawar) बंडानंतर शरद पवारांनी (Sharad Pawar) नाशिकमधून आपला झंझावात सुरु केला. आज शरद पवार यांची येवल्यात जाहीर सभा होत आहे. या सभेत बोलताना राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे ( Amol Kolhe) यांनी भाजपवर चांगलाच हल्ला चढवला. राष्ट्रवादीत मीठाचा खडा टाकणारा शकुनी टरबुज्याच्या आकाराचा की कमळाच्या आकाराचा असा टोला यावेळी […]

Untitled Design (2)

Untitled Design (2)

Amol Kolhe On BJP: अजित पवारच्या (Ajit Pawar) बंडानंतर शरद पवारांनी (Sharad Pawar) नाशिकमधून आपला झंझावात सुरु केला. आज शरद पवार यांची येवल्यात जाहीर सभा होत आहे. या सभेत बोलताना राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे ( Amol Kolhe) यांनी भाजपवर चांगलाच हल्ला चढवला. राष्ट्रवादीत मीठाचा खडा टाकणारा शकुनी टरबुज्याच्या आकाराचा की कमळाच्या आकाराचा असा टोला यावेळी खासदार अमोल कोल्हेंनी टोला भाजपला लगावला. ( Amol Kolhen’s criticism of BJP)

पुढे आपल्या भाषणात बोलताना अमोल कोल्हेनी भाजपाला चांगलेच टार्गेट केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मिठाचा खडा टाकण्याचे काम या शकुनीमामाने केले असा टोला अमोल कोल्हेनी भाजपला लगावला. मिठाच्या खड्याचा आकार टरबुजा सारखा की कमळा सारखा असे म्हणत अमोल कोल्हेनी खिल्ली उडवली.

भाजप देशातील राज्यातून हद्दपार होत आहे. म्हणून महाराष्ट्रात हि खेळी केली आहे. यांनी देशातील जनतेला नऊ वर्षांपूर्वी दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्यात असल्याचे सांगितले होते. परंतु आज या देशातील सरकारमुळे देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे.

https://letsupp.com/politics/nashik-supriya-sule-criticise-on-ajit-pawar-chagan-bhujbal-ncp-yeola-65836.html

आमच्या बोटाला लागलेल्या शाहीला जर तुम्ही चुना समजायला लागला तर काय होत हे संपूर्ण महाराष्ट्र दाखून दिल्या शिवाय राहणार नाही. या गर्दीने कळत की ही जनता पवार साहेबांच्या पाठीशी आहे. आगामी निवडणुकांमध्ये जनता भाजपाला जागा दाखून देईल. असे देखील यावेळी अमोल कोल्हे म्हणाले.

भावा- भावात भांडण लावणाऱ्यांना जागा दाखवण्याची वेळ आली आहे. असे आवाहन अमोल कोल्हेनी जनतेला केलं. काही म्हणतात पांडुरंगाला बडव्यांनी घेरलं, पण यांना पांडुरंगच यांना कळाला नाही असा टोला कोल्हेंनी छगन भुजबळांना लगावला.

जाता – जाता कोल्हे म्हणतात हा तर फक्त टेलर आहे फिचर अजून बाकी आहे. महाविकास आघाडीचा त्रिशूल जेव्हा छाताडात घुसेल तेव्हा भल्या भाल्यांची पळता भुई थोडी होईल. जेव्हा हे वादळ महाराष्ट्रात घोंगेल तेव्हा यांचं टोक तळ्यावर येईल. असा इशारा शेवटी खासदार अमोल कोल्हे यांनी भाजपाला दिला.

 

 

 

Exit mobile version