Hazare Vs Awhad : तुम्हीच, मला एक लाख रुपये द्यावेत; अण्णांच्या कायदेशीर नोटीशीला आव्हाडांचे उलट उत्तर

अहमदनगरः अण्णा हजारे (Anna Hajare)यांच्यामुळे देशाचे वाटोळे झाले. गांधी टोपी घातली म्हणून कोणी गांधी होत नाही, असे वादग्रस्त विधान काही दिवसांपासून शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Ahwad) यांनी केले होते. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी वकिल अॅड. मिलिंद पवार यांच्यामार्फत जितेंद्र आव्हाड यांना बदनामी केल्याप्रकरणी नोटीस बजाविली होती. त्यालाही आव्हाडांनी उत्तर देताना अण्णा […]

तुम्हीच, मला एक लाख रुपये द्यावेत; अण्णांच्या कायदेशीर नोटीशीला उलट उत्तर

Anna Hajare And Jitendra Ahwad

अहमदनगरः अण्णा हजारे (Anna Hajare)यांच्यामुळे देशाचे वाटोळे झाले. गांधी टोपी घातली म्हणून कोणी गांधी होत नाही, असे वादग्रस्त विधान काही दिवसांपासून शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Ahwad) यांनी केले होते. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी वकिल अॅड. मिलिंद पवार यांच्यामार्फत जितेंद्र आव्हाड यांना बदनामी केल्याप्रकरणी नोटीस बजाविली होती. त्यालाही आव्हाडांनी उत्तर देताना अण्णा हजारेंविरुद्ध चुकीचे शब्द वापरले नाहीत. माझ्याविरुद्ध कायदेशीर नोटीस तुम्ही परत घ्या. मला नोटीसला उत्तर देणे, तुम्ही भाग पाडले म्हणून तुम्हीच मला एक लाख रुपये द्यावेत, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.

संसदेत खुलेआम धूर सोडला, आधी UAPA अंतर्गत गुन्हा; आता 7 दिवसांची पोलीस कोठडी

अण्णा हजारे यांचा फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध करून जितेंद्र आव्हाड यांनी हजारेंविषयी चुकीचे शब्द वापरले आहेत. अण्णा हजारे यांची बदनामी केल्याप्रकरणी अण्णांचे वकील मिलिंद पवार जितेंद्र आव्हाड यांना ७ ऑक्टोबर २०२३ रोजी कायदेशीर नोटीस बजावली होती.
ॲड. पवार यांच्या कायदेशीर नोटीशाला जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या वकीलांमार्फत उत्तर पाठविले आहे.

स्पर्धा परीक्षेतील गैरप्रकार अन् पेपरफुटीला लगाम; सरकारकडून समिती गठीत

अण्णा हजारे हे दुसरे गांधी आहेत, असे लोकं म्हणतात हे हास्यास्पद आहे. तसेच माहिती अधिकार कायद्याच्या अंमलबजावणीसाठी किंवा कायदा आणण्यासाठी अण्णा हजारे यांनी काही प्रयत्न केल्याचे कुठल्याही प्रकारचे पुरावे उपलब्ध नाहीत.
तसेच जनलोकपाल, लोकायुक्त कायदा अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे आला हे खोटे आहे. जनलोकपालसाठी अनेक आंदोलने झाली. त्यामध्ये अनेक लोके होते. त्यापैकी अण्णा हजारे हे एक व्यक्ती म्हणून हजर होते. अण्णा हजारे स्वतः ची प्रतिष्ठा व प्रतिमा उंचावण्यासाठी स्वतःला दुसरे गांधी म्हणवून घेत आहेत, असे आव्हाड यांनी उत्तरात म्हटले आहे.

जनलोकपाल व लोकायुक्त कायदा अण्णामुळे हे सपशेल खोटे
अण्णा हजारे यांच्यामुळे माहिती अधिकार कायदा अंमलात आला. अण्णा हजारे यांच्यामुळे जनलोकपाल, लोकायुक्त कायदा अंमलात आला हे देखील सपशेल खोटे आहे. त्यामुळे मी काही कोणाची बदनामी केलेली नाही. या माणसामुळे देशाचे वाटोळे झाले हे वाक्य माझे वैयक्तिक मत होते. अण्णा हजारे यांनी ॲड. मिलिंद पवार यांच्या वतीने पाठवलेली कायदेशीर नोटीस तुम्ही परत घ्या. मला तुमच्या नोटीसला कारण नसताना उत्तर देणे तुम्ही भाग पाडले म्हणून तुम्हीच मला १ लाख रुपये द्यावेत. माझ्यावर कुठलीही कायदेशीर कारवाई करू नये, असे उत्तर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ॲड मिलिंद पवार यांना व अण्णा हजारे यांना पोस्टाने पाठविले आहे.
जितेंद्र आव्हाड यांचे हे उत्तर म्हणजे अण्णा हजारे यांचा अपमान व बदनामी करणारे असून, अण्णांशी बोलून पुढील निर्णय घेणार असल्याचे अण्णांचे वकील मिलिंद पवार यांनी सांगितले.

Exit mobile version