Download App

समाजसेवक अण्णा हजारेंनी गावात थाटला ‘हा’ नवा व्यवसाय

Anna Hazare : लोकपाल आंदोलनामुळे देशभर ख्याती पसरलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे सर्वाना माहीतच आहे. अहिंसेचा मार्ग अवलंब करत व महात्मा गांधींचे विचार आचरण करत अण्णा हे जनतेच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करतात. मात्र आता अण्णा हे एका नव्या कारणामुळे चर्चेत आले आहे. अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धीमध्ये एका नवा व्यवसाय सुरु केला आहे.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आता नागरिकांच्या सुदृढ जीवनासाठी राळेगणसिद्धीत एक नवा प्रकल्प सुरु केला आहे. हजारे यांनी आपल्या गावी म्हणजेच राळेगणसिद्धीत लाकडी घाण्यातून तेल निर्मितीचा प्रकल्प सुरु केला आहे. अण्णांच्या या व्यवसायाचे विशेष म्हणजे ना नफा ना तोटा या तत्वावर अण्णा हे तेल नागरिकांना देतात.

आजकाल नफा मिळवण्यासाठी व झटपट श्रीमंत होण्यासाठी अनेकजण व्यवसाय सुरु करतात. व व्यवसायाद्वारे पैसा कमवून आपले आर्थिक स्वप्न पूर्ण करत असतात. मात्र दुसरीकडे समाजातील नागरिकांच्या हक्कांसाठी लढणारे अण्णा हजारे यांनी सुरु केलेला हा व्यवसाय देखील जनसेवेसाठीच आहे.

आजकाल भेसळ मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यातच सध्या खाद्य तेलामध्ये सुरु असलेल्या भेसळीमुळे अनेक आजार बळावले आहेत. विशेष म्हणजे भेसळयुक्त तेलामुळे अतिशय तरुण युवकांनाही हृदयविकाराचे झटका येऊ लागले आहे. त्यात त्यांना जीव गमवावा लागत असल्याचे ही अत्यंत चिंतेची बाब आहे.

इतरही खाद्य पदार्थांमध्ये भेसळ होत आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन हजारे यांनी राळेगणसिद्धीत लाकडी घाण्यावर तेल निर्मिती प्रकल्प सुरु केला आहे. सध्या इथे सूर्यफूल, करडई, शेंगदाणे आणि नारळाचे तेल काढले जाते. दरम्यान भविष्यात 70 प्रकारच्या वेगवेगळ्या पदार्थांपासून तेल निर्मिती करण्याचा अण्णांचा मानस आहे.

सोहळा संध्याकाळी का नाही ठेवला? राज ठाकरे प्रशासनावर संतापले

पुरस्काराच्या रक्कमेतून सुरु केला व्यवसाय
मिरची पावडर, हळद पावडर, जिरे पावडर आणि विविध प्रकारचे मसाले देखील या प्रकल्पात तयार होणार आहेत. या प्रकल्पाला 24 लाख रुपयांचा खर्च आला आहे, तो अण्णानी त्यांना मिळालेल्या पुरस्काराच्या रक्कमेतून आणि पेन्शनमधून केला आहे. दरम्यान अण्णांना आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहे. देशपातळीवर त्यांचा गौरव देखील करण्यात आला आहे.

Tags

follow us