मोठी बातमी: खरातचा गर्भवती महिलेवरही अत्याचार; नाशिकमध्ये आणखी एक गुन्हा

Ashok kharat - खरात याने महिलेवर तब्बल दोन वर्षे अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. गर्भवती असताना खरात याने पीडित महिलेवर अत्याचार.

Ashok Kharat Fir

Ashok Kharat Fir

Ashok kharat another FIR : महिलेवर लैंगिक अत्याचार प्रकरणात अटकेत असलेले भोंदूबाबा अशोक खरात (
Ashok kharat) उर्फ कॅप्टनविरुद्ध आणखी एक अत्याचाराचा गुन्हा दाखल झालाय. हा गुन्हा नाशिकमधील सरकारवाडा पोलिस स्टेशनला (Sarkarwada Police Station) शनिवारी मध्यरात्री दाखल झालाय. खरात याने महिलेवर तब्बल दोन वर्षे अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. गर्भवती असताना खरात याने पीडित महिलेवर अत्याचार केला असल्याचे फिर्यादीत म्हटलंय. या प्रकरणी पीडित महिलेच्या पतीनेच गुन्हा दाखल केलाय.


एसआयटीकडून अशोक खरात अज्ञातस्थळी; चौकशीसाठी पोलिसांकडून मोठी खबरदारी

अशोक खरातविरुद्ध बीएनएस कलम – 64(1), 74, 351(2) महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013 गुन्हा दाखल झाला आहे. नोव्हेंबर 2023 ते डिसेंबर 2025 या कालावधीत अत्याचार केला आहे. एक महिला गरोदरपणात करावयाच्या विधीसाठी खरात याच्या नाशिकमधील ओकस प्रॉपर्टी येथील कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयात आली होती. गरोदरपणाच्या विधीचे कारण सांगून खरात याने महिलेच्या छातीवर पोटावून हात फिरवून तिच्या योनीमध्ये बोट घालून बलात्कार केला असे फिर्यादीत म्हटले आहे. मला व माझे कुटुंबाला जीवे ठार मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.


नकली साप आणि नकली वाघ ठेवून लोकांना घाबरविले

ऑफिसमध्ये अडचणी घेऊन येणाऱ्या व्यक्तींना त्यांचे मिरगाव येथील ईशान्यश्वर महादेवाचे मंदिराचे ट्रस्टचे बँक अकाउंटवर पैसे घेतले व ट्रस्टचे अकाउंटचा वापर ब्लॅकचा पैसा व्हाईट करण्यासाठी केले असे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच विरगाव येथील मंदिरात मोठा नकली साप व नकली वाघ ठेवून लोकांना घाबरवून व अघोरी कृत्य करून त्यांच्याकडून पैसे वसूल केले तसेच ऑफिसमध्ये विश्वासाने येणाऱ्या महिलांना लघवी पाजून अघोरी प्रकार केले, स्त्रियांना काहीतरी गुंगीकारक पदार्थ खाण्यास व द्रव्य पिण्यास देऊन त्यांना मोहित करून त्यांचे वर लैंगिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Exit mobile version