मुरकुटे घुलेंना नडले, ‘ती’ रक्कम शेतकऱ्यांना परत मिळणार

Balasaheb Murkute Protest For Farmer : भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केलेल्या आंदोलनानंतर लोकनेते मारुतराव घुले – पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे प्रतिटन १०९.६५ पैसे कपात केलेली रक्कम पुन्हा माघारी मिळणार आहे. या संदर्भातील आदेश साखर आयुक्तांनी दिले आहेत.  भेंडे बुद्रूक (ता.नेवासा) येथील लोकनेते मारुतराव घुले – पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सन २०२१ […]

Untitled Design   2023 05 11T200353.017

Untitled Design 2023 05 11T200353.017

Balasaheb Murkute Protest For Farmer : भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केलेल्या आंदोलनानंतर लोकनेते मारुतराव घुले – पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे प्रतिटन १०९.६५ पैसे कपात केलेली रक्कम पुन्हा माघारी मिळणार आहे. या संदर्भातील आदेश साखर आयुक्तांनी दिले आहेत. 

भेंडे बुद्रूक (ता.नेवासा) येथील लोकनेते मारुतराव घुले – पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सन २०२१ – २०२२ च्या चालू गळीत हंगामातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसगाळपामधून शेतकऱ्यांच्या पैशातून प्रती टन १०९.६५ पैसे कपात केली. या कपातीचे रुपांतर ठेवीमध्ये कारखाना व्यवस्थापनाने करुन ठेवले होते.

कारखाना व्यवस्थापनाच्या या भूमिकेविरुद्ध भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या नेत्तृत्वाखाली दिवाळीच्या दिवशी नेवासा तहसील कार्यालयासमोर चटणी भाकर खाऊन माजी आमदार मुरकुटेंनी आंदोलन करुन शासनाचे लक्ष वेधले होते. त्यामुळे याप्रकरणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घातले.

त्यामुळे ज्या सभासदांना कारखान्याने कपात केलेली रक्कम मान्य नसेल त्यांनी पुन्हा कारखान्याकडे अर्ज करुन पैसे माघारी घेवू शकता, असा आदेशच साखर आयुक्तांनी दिला आहे. त्यामुळे मुरकुटेंच्या आंदोलनाला यश आल्यामुळे भारतीय जनता पक्षातर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे.

लोकनेते मारुतराव घुले – पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने गाळप केलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पैशातून प्रति टन १०९.६५ पैसे कपात केलेली होती. ही कपात अयोग्य असल्यामुळे मुरकुटे यांनी वेळोवेळी कपात केलेली रक्कम व्यवस्थापनाने मागे देण्याची विनंतीही केलेली होती. मात्र कारखाना व्यवस्थापनाने कार्यवाही केलेली नव्हती.

शेवटी लोकशाही मार्गाने लढा दिल्यामुळे ज्या शेतकऱ्यांना पैसे माघारी पाहिजे असतील त्या शेतकऱ्यांनी अर्ज करुन पैसे माघारी घेऊ शकता व तसे आदेशही साखर आयुक्तांनी कारखान्याला दिल्यामुळे भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटेंच्या आंदोलनाला यश आल्याचे भाजपाचे नेते अंकुश काळे, शिवसेनेच्या महिला तालुका प्रमुख मिरा गुंजाळ व भाजप – सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून माजी आमदार मुरकुटे यांच्या आंदोलनाला अखेर यश आल्यामुळे आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

Exit mobile version