संगमनेर : माजी मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आजारपणानंतर पहिल्यांदाच आपला मतदारसंघ संगमनेरमध्ये आले. नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजीत तांबे यांच्या उमेदवारीवरून झालेल्या वादानंतर मेव्हणे सुधीर तांबे आणि भाचे सत्यजीत तांबेंना पक्षातून निलंबित करण्यात आलं.
त्यानंतर आमच्या कुटुंबाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला गेल्याच त्यांनी म्हंटल होत… थोरात यांनी काँग्रेस हायकामंडला पत्र लिहीत विधीमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामाही दिला होता आणि त्याच पार्श्वभुमिवर थोरात यांची काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील यांनी भेटही घेतली होती.
दरम्यान थोरात आज अनेक दिवसानंतर मतदार संघात येत असल्यामुळं काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्वागताची जोरदार तयारी केलीय. यादरम्यान थोरात कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून ते नेमकी काय भूमिका मांडतात याकडे राज्याचे लक्ष लागलंय
फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, ‘हे खोटारडे विधान’
संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांची रॅली सुरू आहे जोरदार शक्ती प्रदर्शन देखील बाळासाहेब थोरात यांचे सुरू आहे कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोश आहे. तसेच थोरात यांनी भाऊसाहेब थोरात यांच्या प्रतिमेला अभिवादन देखील केल आहे. बाईक रँलीत त्यांच्यासबत सत्यजीत तांबे देखील सहभागी झालेत.