पांगरमल दारूकांड प्रकरणी जि. प. सदस्या भाग्यश्री मोकाटेंना जामीन मंजूर

अहमदनगर : सन २०१७ मध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या काळात घडलेल्या दारु कांडामधील प्रमुख आरोपी व जिल्हा परिषद सदस्या भाग्यश्री गोविंद मोकाटे (Bhagyashree Govind Mokate) यांना विशेष मोका न्यायाधिश एस. एस. गोसावी (Judge S. S. Gosavi)यांनी जामीन मंजूर केलेला आहे. रश्मिकानंतर आता रतन टाटांचा डीपफेक व्हिडीओ; प्रकल्पासाठी पैसे जमा करण्याचं आवाहन  घटल्याची सविस्तर […]

पांगरमल दारूकांड प्रकरणी जि. प. सदस्या भाग्यश्री मोकाटेंना जामीन मंजूर

Pangarmal liquor case

अहमदनगर : सन २०१७ मध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या काळात घडलेल्या दारु कांडामधील प्रमुख आरोपी व जिल्हा परिषद सदस्या भाग्यश्री गोविंद मोकाटे (Bhagyashree Govind Mokate) यांना विशेष मोका न्यायाधिश एस. एस. गोसावी (Judge S. S. Gosavi)यांनी जामीन मंजूर केलेला आहे.

रश्मिकानंतर आता रतन टाटांचा डीपफेक व्हिडीओ; प्रकल्पासाठी पैसे जमा करण्याचं आवाहन 

घटल्याची सविस्तर हकीकत अशी की, सन २०१७ मध्ये असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत मतदारांसाठी आयोजित केलेल्या जेवणाच्या पार्टीमध्ये विषारी दारुचे सेवन केल्याने ९ जनांचा मृत्यू झाला होता. त्यामध्ये दोघांना अंधत्व आले होते व एक व्यक्ती अपंग झाला होता. संपूर्ण दारु कांडामध्ये एकुण वेगवेगळ्या घटनांत १५ व्यक्तींचा मृत्यू झालेला होता. मात्र ९ जनांच्या मृत्यूसंदर्भात एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन येथे भाग्यश्री मोकाटे व इतर अंदाजे २० आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पुढे मोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली होती.

‘….तर पुंच आणि राजौरी हे भागही पाकिस्तानात गेलं असते’; शहांना फारुख अब्दुल्लांचं उत्तर 

या प्रकरणात माजी जिल्हा परिषद सदस्य भाग्यश्री मोकाटे ह्या सन २०१७ पासून पोलीस रेकॉर्डवर फरारी होत्या, त्यांना ऑगस्ट २०२३ मध्ये अटक करण्यात आली होती व त्यानंतर मागील आठवड्यात नुकतेच सी.आय.डी. तर्फे दोषारोपपत्र त्यांचे विरोधात दाखल करण्यात आले होते.

भाग्यश्री मोकाटे यांच्यावतीने अॅड. सतिश एस. गुगळे यांनी जामीन अर्ज सादर करुन युक्तीवादामध्ये भाग्यश्री मोकाटे यांचा घटनेशी दुरान्वये संबंध नाही. या प्रकरणात मोकाटेंविरुध्द मोका कायद्याच्या तरतुदी लागु होणार नाहीत, असा युक्तीवाद केला. तसेच पुढे एकंदर प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असल्याने व आरोपी विरुद्ध कोणताही सबळ व पुरेसा पुरावा तपासात उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे आरोपीचा थेट संबंध दिसून येत नाही, असा युक्तीवाद केला. घटनेवेळी भाग्यश्री यांचे वय केवळ २० वर्षाचे होते. त्यामुळे त्यांनी आरोपींसोबत कटकारस्थान रचून गुन्हा केला असे प्रथमदर्शनी दिसून येत नाही, ही बाब न्यायालयाचे निदर्शनास आणून दिली.

त्याबाबत न्यायालयाने कायदेशीर बाबी व अॅड. सतिश गुगळे यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरत भाग्यश्री मोकाटे यांना जामीनावर खुले करण्याचा आदेश केला आहे. त्यामध्ये प्रकरणाच्या सुनावणीस नियमीतपणे आरोपीने हजर रहावे व साक्षीदारांवर दबाव निर्माण करु नये, या अटी व शर्तीवर मोकाटे यांना जामीन मंजूर केलेला आहे.

 

 

Exit mobile version