मुलीचा भाबडा प्रश्न अन् निरुत्तर बाप… घरातील प्रसंगावरुन सुजय विखे भरसभेत गदगदले

Sujay Vikhe Patil : अहमदनगर दक्षिणचे खासदार सुजय विखे पाटील हे आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखले जातात. विरोधकांवर बोलताना ते कोणताही हातचा ठेवत नाही, असे बोलले जाते. महाविकास आघाडी सरकार असताना त्यांनी सातत्याने त्या सरकारवर निशाणा साधला होता. पण आपल्या मुलीची आठवण सांगताना सुजय विखे भावूक झाल्याचे दिसून आले. त्यामुळे सुजय विखे यांच्यातील कुटुंबवत्सल बाप जागृत […]

Letsupp Image   2023 06 16T141003.430

Letsupp Image 2023 06 16T141003.430

Sujay Vikhe Patil : अहमदनगर दक्षिणचे खासदार सुजय विखे पाटील हे आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखले जातात. विरोधकांवर बोलताना ते कोणताही हातचा ठेवत नाही, असे बोलले जाते. महाविकास आघाडी सरकार असताना त्यांनी सातत्याने त्या सरकारवर निशाणा साधला होता. पण आपल्या मुलीची आठवण सांगताना सुजय विखे भावूक झाल्याचे दिसून आले. त्यामुळे सुजय विखे यांच्यातील कुटुंबवत्सल बाप जागृत झाल्याचे भरसभेत दिसून आले.

सुजय विखे म्हणाले की,  माझी मुलगी मला विचारते की तुम्ही घरी का येत नाही कारण मी दोन वाजता कारखान्यावर होतो. ही निवडणूक तुमच्या प्रश्नांची आहे. ज्यासाठी आम्ही आमचं सुख सोडून तुमच्यासाठी जागलो कारण इथला कामागार जगला पाहिजे, असे बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले.  ठीक आहे, माझ्या डोळ्यात अश्रू आले असतील पण 19 तारखेनंतर कोणाकोणाच्या डोळ्यात अश्रू येणार आहे, हे मी तुम्हाला सांगेल, असे म्हणत त्यांनी विरोधकांना इशारा दिला.

इंदुरीकर महाराजांचे पुढचे किर्तन तुरुंगात? औरंगाबाद उच्च न्यायालयाचा मोठा दणका

सध्या अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यात असलेल्या गणेश सहकारी कारखान्याच्या निवडणुकीचा प्रचार  थंडावला आहे. या कारखान्याच्या निवडणुकीसाठीचे मतदान 17 जून रोजी होणार आहे. त्यापूर्वी काल अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची सांगता सभा झाली. तेव्हा अहमदनगर दक्षिणचे खासदार सुजय विखे पाटील हे देखील उपस्थित होते. यावेळी सभेला संबोधित करताना सुजय विखेंना अश्रू अनावर झाले.

तसेच यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील विरोधकांवर निशाणा साधला. हे इथं सगळे आलेले सोंगाडे आहेत. त्यामुळे कोपरगावचं पार्सल कोपरगावला जाऊद्या, संगमनेरचं पार्सल संगमनेरला जाऊ द्या, असे म्हणत त्यांनी थोरात आणि कोल्हेंना टोला लगावला. तसेच इथे आलेले सगळे भूसपांगे आहेत. 17 तारखेला यांन आसमान दाखवा, असे विखे म्हणाले.

Adipurush ला प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद; फोटो शेअर करत दिल्या ‘खास’ शुभेच्छा

गणेश कारखान्याच्या निवडणुकीसाठी विखेंच्या विरोधात माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे पॅनेल उभे आहे. विशेष म्हणजे विखे पाटील आणि कोल्हे हे दोन्ही सध्या भाजपमध्येच आहेत. तरी सुद्धा कारखान्याच्या निवडणुकीसाठी हे दोघे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहे.

Exit mobile version