Sujay Vikhe : केंद्र सरकारच्या केंद्रीय ग्राहक संरक्षण, अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने इथेनॉल निर्मितीचे प्रकल्प बंद करण्याचे आदेश दिले आहेत, अशा बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये येत आहेत मात्र इथेनॉल निर्मिती प्रकल्प पूर्णपणे बंद नसून बी हेवी याला बंदी नसून ‘ज्यूस टू इथेनॉल’ याला बंदी घातलेली आहे. यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांवर याचा कुठलाही परिणाम होणार नाही, असे भाजप खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) यांनी स्पष्ट केले. विखे पाटील यांनी स्पष्ट उत्तर दिल्यानंतर सरकारच्या आदेशावरून निर्माण झालेला संभ्रम मिटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सध्या देशात साखरेच्या दरात वाढ झाली आहे. याला कारणीभूत म्हणजे यंदाच्या वर्षी ऊसाच्या उत्पादनात घट झाली असून त्याचा थेट परिणाम दरांवर होत आहे. दरम्यान, याबाबत सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने जूनपासून ऊसापासून इथेनॉल निर्मितीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबाबत अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. यावर बोलताना खासदार सुजय विखे म्हणाले, शासनाने इथेनॉल प्रकल्प बंद करण्याचे आदेश दिले आहेत अशा बातम्या काही प्रसारमाध्यमांमध्ये येत आहेत परंतु शासनाने इथेनॉल पूर्णपणे प्रकल्प बंद करण्याचे आदेश दिलेले नाहीत. इथेनॉल प्रकल्पामधून बी हेवी इथेनॉल उत्पन्न सुरू आहे फक्त ज्यूस टू इथेनॉल याला बंदी घातलेली आहे.
Sujay Vikhe यांच्याकडून लोकसभा, विधानसभेची पायाभरणी; विकास कामांसाठी कोट्यवधींचा निधी
सरकारच्या या निर्णयामुळे भविष्यात साखर टंचाई होऊ नये किंवा साखरेचे भाव वाढू नये म्हणून महागाई नियंत्रणात आणण्यासाठी शासनाने उचललेलं हे पाऊल आहे. तरीही महाराष्ट्र राज्याचे शिष्टमंडळ दिल्लीला जाणार आहे त्यामध्ये योग्य तो तोडगा निघेल असा विश्वास खासदार सुजय विखे यांनी व्यक्त केला आहे.