Download App

‘काम कमी अन् गवगवाचं जास्त; जाहिरातबाजीवरून सुजय विखेंची रोहित पवारांना डिवचलं

  • Written By: Last Updated:

अहमदनगर : पावसाळी अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विविध मुद्द्यांवरून चांगलेच आरोप – प्रत्यारोप झाले. यातच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांकडून जाहिरातीबाजीवर होणाऱ्या खर्चावर टीका केली होती. यावर बोलताना खासदार सुजय विखे यांनी पवार यांना शाब्दिक टोला लगावला आहे. काम नसताना जाहिरात करणे असे जे काही लोक करतात त्यांना अशी भावना येणे स्वाभाविक आहे. असे अनेक लोक आहे, असे अनेक युवा लोकप्रतिनिधी आहे जे की काम कमी व जाहिरात जास्त करतात अशा शब्दात खासदार विखे यांनी नाव न घेता आमदार रोहित पवार यांच्यावर निशाण साधला आहे. सुजय यांच्या या टीकेमुळे सुजय विखे आणि रोहित पवार यांच्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

बोलताना काळजी घ्या! फडणवीसांनी धाडला संभाजी भिडेंना निरोप? माजी आमदार बनला दूत

खासदार सुजय विखे हे नगरमध्ये आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध राजकीय विषयांवर चर्चा केली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला. तत्पूर्वी आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारच्या जाहिरातबाजीवर होणाऱ्या खर्चावरून टीका केली होती.

चीनमध्ये फक्त दोनच तास फोन वापरण्याची परवानगी? कायदाच पारित होणार…

नेमकं काय म्हणाले होते पवार?

सरकारच्या पहिल्या सात महिन्यात जाहिरातीवरील खर्च ₹42.44 कोटी म्हणजेच दिवसाला ₹20 लाख खर्च. शासन आपल्या दारी योजनेचा निव्वळ जाहिरातीचा ₹52.90 कोटी खर्च तर मागच्या वर्षात राबविलेल्या योजनांची यंदा जाहिरात करण्यासाठी ₹26 कोटी खर्च. तसेच सत्ताधारी आमदारांच्या सुरक्षेसाठी एका वर्षाला ₹150 कोटी खर्च असे त्यांनी ट्वीट करून म्हटले आहे. योजना राबविल्या आहेत, कामं केली आहेत, तर इतकी जाहिरात करण्याची खरंच गरज आहे का ? केलेली कामं जनतेपर्यंत पोहचण्यासाठी जाहिराती गरजेच्या आहेत का ? हा वायफळ खर्च टाळून, सर्वसामान्यांसाठी कुठली योजना राबविता आली असती का ? असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे.

आम्ही दोघेही एकच, दोन गट असल्याचा पुरावा नाही; शरद पवार गटाचे EC ला उत्तर

पवारांच्या टीकेला विखेंचे उत्तर

काम नसताना जाहिरात करणे असे जे काही लोक करतात त्यांना अशी भावना येणे स्वाभाविक आहे. असे अनेक लोक आहे, असे अनेक युवा लोकप्रतिनिधी आहे जे की काम कमी व जाहिरात जास्त करतात. मुळातच राज्य सरकारमध्ये काम एवढं जास्त झालं आहे की जाहिराती कमी पडू राहिल्या आहेत यासाठी जाहिराती वाढवल्या पाहिजे. जेणेकरून झालेली कामे जनतेपर्यंत अजून जास्तपर्यंत पोहचतील असे प्रतिपादन खासदार सुजय विखे यांनी केले आहे.

Tags

follow us