Satyajit Tambe : भाजपकडून तांबेंना पाठिंबा देण्याच्या हालचाली?

अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyajit Tambe)यांना भाजपकडून पाठिंबा देण्याच्या हालचाली सुरु झाल्याचं दिसून येतंय. भाजप नेते, आमदार राम शिंदे (Ram Shinde)यांनी सांगितलं की, यासंबंधी स्थानिक पातळीवर चर्चा करून नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushn Vikhe Patil)आजच निर्णय जाहीर करणार आहेत. तांबे यांच्या मतानुसार त्यांनी न मागता भाजपनं पाठिंबा दिल्यास नेमकी […]

Untitled Design   2023 01 28T212757.227

Untitled Design 2023 01 28T212757.227

अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyajit Tambe)यांना भाजपकडून पाठिंबा देण्याच्या हालचाली सुरु झाल्याचं दिसून येतंय. भाजप नेते, आमदार राम शिंदे (Ram Shinde)यांनी सांगितलं की, यासंबंधी स्थानिक पातळीवर चर्चा करून नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushn Vikhe Patil)आजच निर्णय जाहीर करणार आहेत. तांबे यांच्या मतानुसार त्यांनी न मागता भाजपनं पाठिंबा दिल्यास नेमकी अडचण कोणाची होणार? याबद्दलची चर्चा सुरू झालीय.
YouTube video player
आज (दि. 28) शनिवारी प्रचाराचा शेवटचा दिवस. सोमवारी मतदान आहे. त्यामुळं आत्तापर्यंत वेट अॅण्ड वॉचच्या भूमिकेतील भाजपनं हालचाली सुरु केल्या आहेत. याबद्दल भाजपचे प्रवक्ते राम शिंदे यांनी सांगितलं की, या मतदारसंघात ज्या उमेदवाराला काँग्रेसची उमेदवारी दिली, ती त्यांनी फेटाळली. त्यामुळं काँग्रेसनं बंडखोर उमेदवार आणि त्यांच्या वडिलांवरही निलंबनाची कारवाई केली. हा अपक्ष उमेदवार आमच्या नगर जिल्ह्यातील आहे. आमचा स्थानिक पातळीवरील विषय आहे. त्यामुळं आता स्थानिक पातळीवर चर्चा करून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज निर्णय घेतील. त्यानुसार आमच्या नगर जिल्ह्यात मतदानाची प्रक्रिया पार पडेल. माझी मुंबईत विखे पाटलांशी चर्चा झाली आहे. ते आज निर्णय घेणार असल्याचंही आमदार शिंदे म्हणाले.

भाजपचा हा निर्णय स्थानिक पातळीवर अर्थात अहमदनगर जिल्ह्यापुरता असेल, असं यातून शिंदे यांनी सूचित केलंय. भाजपचा पाठिंबा जाहीर झाल्यानंतर यापूर्वी पाठिंबा दिलेल्या अन्य संघटनांची काय भूमिका राहील? नगर जिल्ह्यात याचा किती परिणाम होईल? याची चर्चा सुरू झालीय.

Exit mobile version