Download App

Jalgaon : एच3एन2ने नागरिक त्रस्त, वायरल इन्फेक्शनचा प्रादुर्भाव

जळगाव – राज्यात सध्या एच3एन2 (H3N2) या साथीच्या आजाराच (Viral infection) प्रदुर्भाव झाल्याचे पाहायला मिळते आहे. जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात याचा प्रादुर्भाव वाढला आहे. थंडी, ताप, खोकला आणि अशक्तपणा ही लक्षणं या आजारात दिसून येत आहेत. त्यामुळे शासकीय आणि खाजगी रुग्णालयात रुग्णांच्या रांगा लागल्या आहेत.

गेल्या महिन्याभरात जळगाव जिल्ह्यात एन्फ्लुएन्झा सदृश्य एच3एन2 या व्हायरल इंफेक्शनच मोठा प्रादुर्भाव झाल्याचे पाहायला मिळते आहे. सांधेदुखी, डोकेदुखी, उलट्या आणि ताप अशी लक्षणे असलेली रुग्णं घराघरात पाहायला मिळत आहेत. जवळजवळ तीस ते चाळीस टक्के रुग्णांमध्ये हा प्रादुर्भाव वाढल्याने आरोग्य यंत्रणेवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळते आहे. या प्रादुर्भावावर बचाव करायचा असेल कोरोनाच्या बाबत जे नियम पाळण्यात येत होते. तशाच प्रकारची काळजी घ्यावी लागणार आहे, असे तज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे.

Ajit Pawar : फडणवीसांना जेलमध्ये टाकण्याचा प्लॅनवर अजितदादांचे थेट उत्तर

गेल्या महिन्याभरापासून होत असलेल्या प्रादुर्भावावर अनेक तज्ञ डॉक्टर लक्षणानुसार उपचार करीत आहेत. तरी देखील 15 ते 20 दिवस रुग्णांमध्ये ही लक्षणे आढळून येत आहेत. आर्थिक परिस्थित खराब असलेल्या रुग्णांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो आहे. आजारपणामुळे अनेकांचा रोजगार बुडत आहे. तसेच दवाखान्याच्या खर्च देखील सोसावा लागतो आहे. अशा प्रकारे दुहेरी संकटाने जळगाव त्रस्त झाले आहेत.

गेल्या आठवड्यात राज्यभरात वातावरण बदल झाला होता. अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस, गारपीट झाल्याने थंडीची लाट आली होती. जळगाव जिल्ह्यात देखील याचा परिणाम झाला होता. अचानक झालेल्या वातावरण बदलाने आणखी काही दिवस साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव राहण्याचा तज्ञ डॉक्टरांचा अंदाज आहे. नागरिकांना सोशल डिस्टेंसिंग पाळावे तसेय काही लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आरोग्य विभागाकडून अवाहन करण्यात आले आहे.

Tags

follow us