Karjat–Jamkhed MIDC : राज्याचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरु असून या अधिवेशनात सर्वाधिक चर्चेचा व गाजलेला विषय म्हणजे नगर जिल्ह्यातील कर्जत – जामखेड एमआयडीसी होय. मात्र हा विषय अद्यापही प्रलंबित असल्याने याप्रश्नी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. एमआयडीसी व्हावी यासाठी कर्जत – जामखेडमध्ये गुरुवारी रास्तारोको करण्यात आला होता. आता त्यापाठोपाठ आज पवारांच्या मतदारसंघात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येत आहे. तब्बल 20 हजार नागरिकांच्या स्वाक्षऱ्या या शासनाकडे सादर केल्या जाणार आहे. ( Clashes between Rohit Pawar Ram Shinde peoples signing for Karjat–Jamkhed MIDC)
‘तुम्ही जामखेडच्या एमआयडीसीसाठी काय केलं?’ जुना इतिहास बाहेर काढत शिंदेंचा रोहित पवारांवर घणाघात
कर्जत – जामखेड एमआयडीसी (Karjat – Jamkhed MIDC) प्रश्न आता चांगलाच पेटला आहे. भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde) व राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यामध्ये या प्रश्नावरून जोरदार राजकीय युद्ध पेटले आहे. यातच आता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील या मुद्द्यावरून चांगलेच आक्रमक झाले आहे. राष्ट्रवादीच्या वतीने गुरुवारी कर्जत- मिरजगाव – खर्डा अशा विविध ठिकाणी आज रास्तारोको आंदोलन करण्यात आले आहे. तर आता याचाच पुढचा भाग म्हणजे आज पवार यांच्या मतदार संघातील गावांमध्ये नागरिकांच्या स्वाक्षऱ्या मोहीम राबवली जात आहे.
पुण्यात अमित शहा, मोहन भागवतांच्या दौऱ्यावेळी पालिका अधिकाऱ्यांमध्ये जोरदार राडा
आपल्या तालुक्यातील तरुणांना रोजगार मिळावा यासाठी एमआयडीसी होणे किती गरजेचे आहे याचे महत्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गावोगावी पटवून देत आहे. तसेच हा प्रश्न मार्गी लागावा यासाठी नागरिकांच्या सह्या देखील घेतल्या जात आहे. एकंदरीतच एमआयडीसी मंजूर झालीच पाहिजे असे धोरण रोहित पवार यांच्यासह मतदारण संघातील नागरिकांनी देखील घेतले आहे.दरम्यान आज एमआयडीसीच्या मुद्द्यावरून एक महत्वाची बैठक पार पडणार आहे. याची माहिती रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर खात्यावरून दिली आहे.
नेमकं काय आहे ट्विट
माझ्या मतदारसंघातील MIDC ची अधिसूचना काढण्यासंदर्भात गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडलेल्या लक्षवेधी सूचनेनुसार विधानसभेचे अध्यक्ष मा. राहुल नार्वेकर यांनी आज (शुक्रवार) दुपारी साडेतीन वाजता संसदीय कार्यमंत्री, उद्योगमंत्री आणि #MIDC च्या सर्व अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित केलीय. या बैठकीत मी पूर्ण क्षमतेने मतदारसंघातील युवांची बाजू मांडणार आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या भूमिकेकडं माझ्या मतदारसंघासोबतच संपूर्ण महाराष्ट्रातील युवकांचे लक्ष आहे. ते युवकांच्या बाजूने निर्णय घेणार की राजकीय दबावाला बळी पडणार हे या बैठकीत दिसेलच. पण माझीही त्यांना विनंती आहे की, कोणत्याही दबावाला बळी न पडता त्यांनी यातून सकारात्मक मार्ग काढावा.