मोठी बातमी: अहिल्यानगरमध्ये नायब तहसीलदाराने रेल्वेखाली जीवन संपविले

Ahilyanagar: नायब तहसीलदार किरण रामदास देवतरसे (वय ५८) यांनी शनिवारी आपले जीवन संपविले. सहा महिन्यांनी ते निवृत्त होणार होते.

Ahilyangar Navab Tahsildar

Ahilyangar Navab Tahsildar

अहिल्यानगर : अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक कर विभागाचे नायब तहसीलदार किरण रामदास देवतरसे (वय ५८) यांनी शनिवारी आपले जीवन संपविले. सकाळी नऊ वाजेच्या सुमारास निंबळक परिसरात रेल्वे खाली आत्महत्या केली. सहा महिन्यांनी ते निवृत्त होणार होते. तत्पूर्वी त्यांनी आत्महत्या केल्याने महसूल प्रशासनात उलटसुलट चर्चा सुरू आहे. (Deputy Tehsildar ends life under train in Ahilyanagar )


महसूल कारभारावर गालबोट

अहिल्यानगर हा राज्यातील सर्वात महत्वाचा जिल्हा आहे. या जिल्ह्यातील महसूल प्रशासन हे राज्यात आदर्श घडविणारे राहिले आहे. राज्याला मार्गदर्शक ठरेल असा लखिना पॅटर्न इथलाच. मात्र, आज या जिल्ह्यातील महसूल प्रशासनातील कारभारावर गालबोट लागणारी घटना घडली आहे. सेवानिवृत्तीला अवघे सहा महिने उरलेले असलेले ज्येष्ठ कर्मचारी तथा नायब तहसीलदार किरण देवतरसे यांनी स्वतः रेल्वे रुळावर उडी मारत आत्महत्या केली आहे. मनमिळावू व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी अचानक असा टोकाचा निर्णय का घेतला? याबाबत चर्चा रंगली आहे. ते भिंगारच्या साईनगरी, आलमगीर परिसरात राहतात. मात्र, त्यांनी आत्महत्या थेट निंबळक परिसरात येऊन केली. ही घटना आज सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.


देवतरसे यांनी आत्महत्या का केली?

त्यांनी श्रीगोंदा, शेवगाव तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांतही काम करण्याचा त्यांचा दांडगा अनुभव होता. मागील दोन वर्षांपासून ते जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे प्रमुख म्हणून ते काम पाहत होते. मागील तीन दिवसांपासून देवतरसे हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचामुळे व प्रशासकीय कामामुळे तणावात होते, अशी चर्चा महसूल प्रशासनात आहे. त्यांच्या आत्महत्येनंतर त्यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या कक्षातील महत्त्वाचे अधिकारी व कर्मचारी तेथे उपस्थित होते. शिवाय पोलीस प्रशासनानेही या परिसराला छावणीचे स्वरुप प्राप्त करून दिले होते. देवतरसे यांनी आत्महत्या का केली? याची केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत निपक्षपाती चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे.

Exit mobile version