Nashik Crime : मुलीचं अपहरण करणाऱ्याच्या घराबाहेरच आई-वडिलांवर अंत्यसंस्कार

Nashik Crime : नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलीचं डोळ्यासमोर अपहरण झाल्यानं हताश झालेल्या आई-वडिलांनी रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना नाशिकच्या देवळाली कॅम्प इंथ घडली आहे. पण ज्या तरुणानं मुलींच अपहरण केलं त्याच्या घरासमोर मुलीच्या मृत आई-वडिलांवर अंत्यसंस्कार करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे अवघा महाराष्ट्र हादरला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असं की रविवारी […]

UPSC Exam (8)

UPSC Exam (8)

Nashik Crime : नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलीचं डोळ्यासमोर अपहरण झाल्यानं हताश झालेल्या आई-वडिलांनी रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना नाशिकच्या देवळाली कॅम्प इंथ घडली आहे. पण ज्या तरुणानं मुलींच अपहरण केलं त्याच्या घरासमोर मुलीच्या मृत आई-वडिलांवर अंत्यसंस्कार करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे अवघा महाराष्ट्र हादरला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असं की रविवारी दुपारी निवृत्ती खातळे हे आपली पत्नी मंजुळा निवृती खातळे आणि मुलीसह भरविहिर गावाकडं जात होते. वाटेत घोटी हायवे जवळ वाजे पेट्रोल पंपासमोर समाधान सोमनाथ झनकर आणि त्याच्या साथीदारांनी खातळे यांची गाडी अडवली. यानंतर त्यांनी मुलीला आई-वडिलांसमोरच आपल्या वाहनात बसवून घेऊन गेले.

पाचच दिवसांनी शिंदे-फडणवीस पुन्हा नगरला; निळवंडेतील पाणी सोडण्याची चाचणी

एकतर्फी प्रेमातून आपल्या 19 वर्षीय तरुण मुलीचं डोळ्यासमोर अपहरण झाल्यानं निराश झालेल्या खातळे दांपत्यानं भगूर येथील नूतन शाळेमागे गोदान एक्स्प्रेसखाली उडी घेत आपलं जीवन संपवलं. या घटनेची नाशिकरोड लोहमार्ग पोलिसांत आकस्मिक मृत्यू म्हणून तर मुलीचे मामा दिगंबर शेळके यांच्या फिर्यादीवरुन सिन्रर पोलिसांत झनकर आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर आज सकाळी भरविहिर येथील गावकरी आणि नातेवाईकांनी खातळे दाम्पत्यांचा मृतदेह ताब्यात घेऊन झनकर यांच्या घरासमोरच त्यांच्या पार्थिवार अंत्यसंस्कार केले. या प्रकारामुळं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Exit mobile version