Download App

गिरीश महाजन यांची शिष्टाई यशस्वी! धनगर आरक्षण आंदोलन मागे…

Dhangar Reservation : धनगर आरक्षणासाठी अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी गावात गेल्या 20 दिवसांपासून यशवंत सेनेच्यावतीने आंदोलन सुरु होते. आज मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan)हे चौंडीमध्ये आले होते. त्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. त्यानंतर महाजन यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्याशी आंदोलनाबाबत फोनवरुन चर्चा केली. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आहे. यावेळी उपोषणकर्ते सुरेश बंडगर आणि अण्णासाहेब रुपनर यांचं उपोषण सोडवण्यात आले आहे.

Manmohan Singh यांची देशाच्या राजकारणात एन्ट्री कशी झाली? पाहा व्हिडिओ

गिरीश महाजन म्हणाले,

धनगर आरक्षणाच्या संदर्भात सह्याद्री अतिथी गृहावर बैठक झाली. राज्य सरकारने धनगर समाजाच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. काही तांत्रिक अडचणी आहेत. त्या सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आंदोलन काळात काही धनगर बांधवांवर गुन्हे दाखल करण्यात आले, तेही मागे घेण्याचे आश्वासन यावेळी गिरीश महाजन यांनी आंदोलकांना दिले आहे. धनगर समाजासाठी लागू केलेल्या योजना प्रभावीपणे लागू केल्याचेही यावेळी महाजन यांनी सांगितले.

महिला आरक्षणाचे निर्णय काँग्रेस सरकारनेच घेतले, हे पंतप्रधानांना माहिती दिसत नाही; पवारांचा टोला

चौंडीमधील दोन्ही उपोषणकर्त्यांची तब्येत चांगलीच खालावली होती, त्यामुळे राज्य सरकारकडून धनगर आरक्षण सोडवण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरु होते. आज मंत्री गिरीश महाजन यांची शिष्टाई यशस्वी झाली असून धनगर आरक्षण आंदोलन मागे घेण्यात आले आहे.

धनगर आरक्षणासाठी अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी गावात गेल्या 20 दिवसांपासून यशवंत सेनेच्यावतीने आंदोलन सुरु आहे. दिवसेंदिवस हे आंदोलन आक्रमक होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज मंगळवारी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलकांशी त्या ठिकाणी जाऊन चर्चा केली. त्याचबरोबर आंदोलकांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा घडवून आणली.

मंत्री गिरीश महाजन यांनी चौंडीत आंदोलकांची भेट घेण्यासाटी पोहोचले, मात्र नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या आंदोलकांकडे पाठ फिरवल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आंदोलक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी आंदोलकांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा धिक्कार असोच्या घोषणा देण्यात आल्या.

उपोषणस्थळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात यावेळी वातावरण तापलेलं पाहायला मिळालं. त्या ठिकाणी आंदोलकांनी आमची मतं चालतात मात्र भंडारा नको, असा सवालही उपस्थित केला. त्यामुळे आता या आंदोलकांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळत आहे. शेवटी मंत्री गिरीश महाजन यांची शिष्टाई यशस्वी झाली. त्यानंतर धनगर आरक्षणाचे उपोषण मागे घेण्यात आले आहे.

Tags

follow us