जुन्या वादातून धीरज परदेशीचा काटा काढला; मुख्य आरोपीने उलगडला हत्येचा कट

Dhiraj Pareshi: धीरज परदेशी यांच्या हत्याप्रकरणावरून मोठा तणाव निर्माण झाला होता. त्याला धार्मिक वळणही मिळाले.

Dhiraj Pardeshi

Dhiraj Pardeshi

Dhiraj Pareshi case: अहिल्यानगर मुकुंदनगरमध्ये (Ahilyanagar) महानगरपालिकेचे कंत्राटी कर्मचारी धिरज कचरूसिंग रजपूत (परदेशी) (Dhiraj Pareshi) यांची हत्या झाली होती. या हत्येमुळे नगरमधील वातावरण चिघळले होते. या प्रकरणात आतापर्यंत 13 जणांना पोलिसांनी आरोपी केले असून, प्रत्यक्षात हत्येत सहभागी आणि त्यांना मदत करणाऱ्या बारा आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे. आरोपींच्या जबाबातून हत्येचे कारणही समोर आलेले आहे. धीरज परदेशी यांच्या हत्याप्रकरणावरून मोठा तणाव निर्माण झाला होता. त्याला धार्मिक वळणही मिळाले. कपाळवरील टिळा पाहून त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोपही झाला होता. आता परदेशी याची हत्या का आणि कशी झाली, याची माहिती पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या तपास अहवालावरून समोर आली आहे.

या गुन्ह्यात आतापर्यंत 12 आरोपींना अटक झाली आहे. त्यांना रिमांड साठी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक तेजश्री थोरात यांनी रिमांड रिपोर्ट न्यायालयात सादर केला. त्यात त्यांनी या घटनेतील मुख्य आरोपी मुस्तकीम ख्वाजामियाँ सय्यद याने पोलिसांकडे दिलेल्या जबाबाची माहिती दिली आहे. बकरी ईद सणाच्या एक दिवस अगोदर आरोपी मुस्तकिम सय्यद हा मार्केट यार्ड येथून जात होतो. त्याने बाईकचा जोरात हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून धीरज रजपूत व मास्क घातलेल्या इतर 15 ते वीस जणांनी मुस्तकिम सय्यदला मारहाण केली होती. एक महिल्यापूर्वी मुस्तकिम इंन्स्टाग्राम पाहत होता. तेव्हा त्याला धीरज रजपूत याचा फोटो दिसला. तेव्हा तो फोटो त्याने त्याचा चुलत भाऊ सिराज व मेहराज यांना दाखवून झालेले वादाबाबत माहिती दिली.

काही हिरो जन्माला येतात, काही ट्रेनिंग घेतात… आणि काहींचं अपहरण होतं! अमेझॉन एमजीएम स्टुडिओजने ‘वाइब’चा धमाल टीझर केला रिलीज


धीरजच्या हत्येचा कट कसा रचला ?

7 ऑगस्टला रोजी मुस्तकिम सय्यद हा दुपारी दोन वाजता कोठला परिसरात होता. त्याला सिराज इब्राहिम सय्यद याचा फोन आला. दर्गादायरा कब्रस्तान येथे पटकन ये, तूला यापुर्वी मारहाण करणारा धीरज रजपूत येथे आलेला आहे, असे सिराजने मुस्तकिमला सांगितले. मुस्तकिम हा अडीच वाजता दर्गा दायरा येथे गेला होता. त्याच्या आधीच सिराज सय्यद, मुस्तकिमचे चुलते अबजीमिया सय्यद हे तिथे हजर होते. त्यानंतर सिराज याने मेहराज सय्यद यास फोन करुन दर्यादायरा येथे येण्यास सांगितले. तसे जाहीद शेख व मोहंम्मद रशाद सय्यद व राहिल शेख यांना फोन करुन दर्गादायरा येथे बोलावू घेतले. जाहीद आल्यानंतर त्याने त्याचे मित्र अरमान सय्यद व हुजेफ शेख यांना बोलावून घेतले. तेव्हा आम्ही सर्वांनी चर्चा करुन धीरज कचरुसिंग रजपुत (परदेशी) यास कोठे मारायचे व कशाने मारायचे याबाबत चर्चा केली व त्यास जीवे ठार मारण्याचा कट केला.

त्यानंतर सिराज याने मेहराजचे रिक्षामध्ये असलेला सत्तूर काढुन त्याच्या हातामध्ये घेतला. त्यानंतर आम्ही दर्गादायरा कब्रस्तानचे गेटमधू बाहेर आलो. त्यावेळी धीरज रजपुत हा तेथे लाईटचे काम करत होता. सिराजने धीरजला हाताने मारायला सुरुवात केली. त्यावेळी तेथे जवळच घराचे बांधकाम चालू असल्याने तेथे पडलेल्या लाकडी दांडके हातामध्ये घेतले व धीरज रजपुत यास लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली. तो जखमी होऊन खाली पडल्याने सर्वजण त्याचे हातातील दांडके तेथेच टाकून निघून गेले.


सोन्याच्या वाढत्या किमतींचा फायदा; गोल्ड लोन व्यवसायात टाटा-गोदरेज-बिर्लाची मोठी गुंतवणूक


दांडके लपविले, कपडे बदलले…

मुस्तकिम सय्यद तिथे पडलेले तीन दांडके घेऊन मोहंम्मद सय्यद याच्या मोटारसायकलवरुन दर्ग्याचे पाठीमागे गेले. ते लाकडी दांडके दर्गादायरा कब्रस्तानचे कंपांउंडचे लगत असलेल्या तोडलेल्या झाडाच्या खोडाखाली लपवून ठेवले. मुस्तकिम, सिराज व मेहराज असे मेहराजच्या रिक्षात बसू राजनगर येथे भाऊ इम्रान याचे घरी गेलो. तेथे मेहराजने अंघोळ केली व कपडे बदलले. तेथे मुस्तकिमचे वडील ख्वॉजामिया आले. त्यांनी मामा इम्रा मुसा सय्यद यांच्या घरी सोडले. त्यानंतर मुस्तकिम सय्यद याने स्वत:च्या गाडीची चावी मामाला दिली. त्यांना स्वत: दर्गादायरा येथे लावलेली पॅशन गाडी घरी घेवून येण्यास सांगितली. ते गाडी आणायला गेले. ते गेल्यानंतर मुस्तकिमने शर्ट बदलला शर्ट बदलला आणि मोबाईल त्यांच्या घरीच ठेवला. त्यानंतर मामा इम्रान परत घरी आले. त्यांनी मुस्तकिमला हॉटेल महाराजा जवळ त्यांचे बर्गमन मोटार सायकलवरुन नेवून सोडले. तिथे मुस्तकिमचे वडिल ख्वॉजामिया, वसीम सय्यद, सिराज सय्यद, मेहराज सय्यद हे विंटो गाडीमध्ये थांबलेले होते.

रेल्वेने सिंकदाराबादला पळाले
तेथून मुस्तकिमचे वडील व वसीम सय्यद यांनी आरोपींना छपत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन येथे नेऊन सोडले. सिराज याच्याकडे मुस्तकिमचे वडिल ख्वाजामिया व वसाम सय्यद यांनी खर्चासाठी 16 हजार रुपये दिले होते. तिथून रेल्वेचे संभाजीनगर ते सिकंदराबाद (हैदराबाद) जाणारी तिकीटे काढून दिली. त्यानंतर रेल्वेने सिकंदराबाद येथे गेलो असे सांगत मुस्तकिमने साथीदार आरोपीसह गुन्हयाचा कट करुन गुन्हा केल्याची कबुली दिलीय. धीरज परदेशी याची हत्या भगवा टिळा लावल्यावरून झाल्याचा दावा केला होता. परंतु पोलिस तपासात वेगळेच कारण समोर आलेले आहे.

Exit mobile version