Download App

Ahmednagar Fog : अहमदनगर शहरासह जिल्ह्यात धुक्याची चादर

  • Written By: Last Updated:

अहमदनगर : हवेतील आद्रतेचे प्रमाण वाढल्यामुळे अहमदनगर शहरासह जिल्ह्यात आज सकाळी सर्वत्र धुके पडल्याचे दिसून आले. या धुक्यात फिरण्याचा आनंद नगरकरांनी आज लुटला.

अहमदनगर शहरासह परिसरात काल संध्याकाळपासूनच हवेतील आद्रतेचे प्रमाण वाढलेले होते. मागील तीन-चार दिवसांपासून सकाळी धुके पडत होते. मात्र आज मोठ्या प्रमाणात शहरातसह जिल्ह्यात धुके पडल्याचे दिसून आले.

शहरातील सर्जेपुरा, तोफखाना, लाल टाकी, सावेडी, केडगाव, मार्केट यार्ड परिसरात मोठ्या प्रमाणात धोक्याची चादर दिसून आली. मॉर्निंग वॉकसाठी निघणाऱ्या नगरकरांनी व शाळेत निघालेल्या विद्यार्थ्यांनी या धुक्याचा आनंद घेतला. मात्र रब्बी पिकांना या धुक्यामुळे रोगराई पडण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे.

तसेच जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात धुक्याची दाट चादर पाहायला मिळाली. या धुक्यामुळे जिल्ह्यातील महामार्गावर वाहन चालकांना वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागली. या धुक्यामुळे थंडीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.

Tags

follow us