Download App

कर्जत एमआयडीसीच्या प्रस्तावित जागेत नीरव मोदीची जमीन; राम शिंदेंच्या दाव्याने मोठी खळबळ

मुंबई : कर्जत येथील एमआयडीसी होणाऱ्या ठिकाणी नीरव मोदी याची जमीन आहे असा दावा करत माजी मंत्री आणि भाजप आमदार राम शिंदे यांनी मोठी खळबळ उडवून दिली आहे. मात्र हा नीरव मोदी नेमके कोण आहेत याची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी हा नीरव मोदी कोण? अमेरिकेत गेलेला की इतर कोणी याची चौकशी करू आणि त्यानंतरच अधिसूचना काढू असं आश्वासन दिलं आहे. (Former minister and BJP MLA Ram Shinde has claimed that Nirav Modi owns land at the MIDC venue in Karjat)

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील एमआयडीसीचा प्रश्न सध्या कमालीचा चर्चेत आहे. अधिवेशनात विधिमंडळाच्या दोन्हीही सभागृहात एमआयडीसी मुद्द्यावरुन प्रश्न विचारले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) स्थानिक आमदार रोहित पवार आणि भाजपचे विधानपरिषदेचे आमदार राम शिंदे यांनी या मुद्द्यावरुन एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपही केले आहेत.

‘अजित पवार यांचं ‘ते’ वक्तव्य अत्यंत वाईट’; उद्धव ठाकरेंनी अजितदादांना पहिल्यांदाच सुनावलं

या मुद्द्यावर बोलताना राम शिंदे म्हणाले, कर्जत येथे होणाऱ्या एमआयडीसीचा विषय मी अनेकदा याआधीही मांडलेला आहे. मतदारसंघातील शेतकऱ्यांना, युवकांना रोजगार मिळावा अशीच माझी पहिल्यापासूनची भूमिका असून, लवकरात लवकर एमआयडीसीची अधिसूचना निघावी. पण नेमकी कोणासाठी एमआयडीसी होणार आहे असा प्रश्न सध्या पडल्याशिवाय राहत नाही.

रोहित पवार यांचं नाव न घेता राम शिंदे म्हणाले, एमआयडीसी मतदारसंघात व्हावी, ही मागणी रास्त आहे, मात्र कोणत्या एका विशिष्ट जागी व्हावी अशी मागणी करणं हा काय प्रकार आहे? कर्जत तालुक्यात गरीब शेतकरी आहेत. पण कवडीमोल भावाने त्या जमिनी गुंतवणूकदारांनी विकत घेतल्या आहेत. खंडाळा आणि पाटेगाव येथे नीरव दीपक मोदी, मनिषा अण्णा काचोले, नयन गणेश अग्रवाल, कमलेश रतीलाल शहा, पंकज विनोद खन्ना, गणेश अग्रवाल यांच्या जमिनी आहेत. हे शेतकरी नेमके कोण आहेत? याची चौकशी होणं गरजेचं असल्याचं राम शिंदे म्हणाले.

कर्जत एमआयडीसीच्या प्रस्तावित जागेत नीरव मोदीची जमीन; राम शिंदेंच्या दाव्याने मोठी खळबळ

या मुद्द्यावर उत्तर देताना उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले, सरकारचा कर्जत एमआयडीसीला कसलाही विरोध नसून, सहमती आहे. मात्र एमआयडीसीसाठी शेतकऱ्यांची सलग जमीनी मिळायला हव्यात. तसंच बा नीरव मोदी कोण? अमेरिकेत गेलेला की इतर कोणी याची चौकशी करू. इतर तांत्रिक मुद्द्यांमध्ये इकोझोन, जलसंपदा विभागाची पाण्याची व्यवस्था आदी पायाभूत सुविधांबाबत तांत्रिक अहवाल येणे गरजेचे आहे. या सर्व तांत्रिक बाबी तपासून त्याचबरोबर या ठिकाणची जमीन कोणत्या नीरव मोदीच्या नावाने आहे, याबाबतही माहिती घेऊन त्यानंतरच येथील एमआयडीसीला परवानगीची अधिसूचना काढली जाईल, असं आश्वासनही सामंत यांनी दिले.

Tags

follow us