Download App

अहमदनगर : जिल्हा सुखावला… भंडारदरा, मुळा, निळवंडे धरण क्षेत्रात चांगला पाऊस, पर्यटकांची वर्दळ वाढली

  • Written By: Last Updated:

Bhandardara : अहमदनगर जिह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा पाणलोटात मान्सून चांगलाच सक्रिय झाला आहे. या ठिकाणी पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली असल्याने धरणाच्या पाण्यात चांगली वाढ झाली आहे. भंडारदरा पाणलोट क्षेत्रात सातत्याने कोसळत असलेल्या पावसाने पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरु आहे. गेल्या 24 तासात एकुण 250 दशलक्ष घनफूट पाणी जमा झाले. दरम्यान, भंडारदरा धरणाचा पाणीसाठा 6530 दशलक्ष घनफूट झाला आहे, तर धरण हे तब्बल 60 % भरले आहे. पावसामुळे येथील परिसर खुलला असून पर्यटकांची वर्दळ याठिकाणी आता वाढू लागली आहे. (Good news for tourists! Bhandardara, presence of rain in Mula dam catchment)

मुळा धरणातही पाण्याची चांगली आवक

नगर जिल्ह्यासाठी जीवनदायिनी ठरलेल्या मुळा धरण परिसरात देखील पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी सुरु असलेल्या पावसामुळे मुळा धरणात देखील नवीन पाण्याची आवक सुरू झाली आहे. रविवारी सकाळपर्यंत या धरणात 203 दशलक्ष घनफूट पाणी नव्याने दाखल झालं आहे. तसेच निळवंडे धरणात देखील आता नवीन पाण्याची आवक सुरु झाली असून धरणाचा पाणीसाठा 24% झाला आहे.

भंडारदरा परिसरात काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावली असल्याने डोंगरांवरून धबधबे कोसळू लागले आहेत. यातच परिसरातील अनेक धबधबे कोसळू लागले असल्याने शनिवारी आणि रविवारी हजारो पर्यटकांनी भंडारदरा परिसरात गर्दी केली होती. सध्या भंडारदरात दाट धुक्यांनी वेढलेले रस्ते, उंच डोंगरावरून पडणारे धबधबे तर निसर्गाने पांघरलेला हिरवा शालू हे मनमोहक दृश्य निर्माण झाले असल्याने पर्यटक या ठिकाणी आकर्षित होऊ लागले आहे.

NCP Political Crisis: राष्ट्रवादी खरी कोणाची? शरद पवार की, अजित पवार ‘या’ फॉर्म्युल्यावर निवडणूक आयोग देणार निर्णय

अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा, निळवंडे आणि मुळा या तीन महत्वाच्या धरणापैकी भंडारदरा हे एक प्रमुख धरण आहे. यातच आता भंडारदरा पाणलोटात मुसळधार पाऊस कोसळत असून भात लागवडीच्या कामांना वेग प्राप्त झाला आहे. भाताची रोपे लवकरच लावणीयोग्य झाली असल्याने शेतकऱ्यांनी भाताची लागवड सुरु केली आहे. या ठिकाणच्या अनेक भागात भात लागवडीस वेग आल्याचे दिसुन येत आहे.

Tags

follow us