Download App

सत्तेचा माज चांगला नसतो; गोपीचंद पडळकरांचा महाविकास आघाडीवर घणाघात

Gopichand Padalkar : आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती (Punyashlok Ahilya Devi Holkar Jayanti) जामखेडच्या चौंडीत साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis), अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे(Radhakrishna Vikhe), खासदार सुजय विखे पाटील(Sujay Vikhe Patil), अहमदनगर जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, आमदार राम शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. त्याचवेळी राष्ट्रवादीवरही जोरदार हल्लाबोल केला. त्याचवेळी आपला जे सन्मान करत आहेत, त्यांना आपण साथ दिली पाहिजे असंही यावेळी पडळकर म्हणाले. त्याचवेळी बारामतीच्या मेडिकल कॉलेजला अहिल्यादेवींचं नाव द्यावं अशी मागणीही आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. सत्तेचा माज चांगला नसतो,असं म्हणत महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केली आहे.

Ahmednagar name change : फडणवीसांचा होकार; अहिल्यानगरचा मुहूर्त ठरला…

आज अखंड हिंदुस्थानाच्या लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आज देशाच्या कानाकोपऱ्यातून अहिल्यादेवींना अभिवादन करण्यासाठी चौंडीत आले आहेत. गेल्या वर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा विचार मान्य नाही, ज्यांना मल्हारराव होळकरांचा इतिहास मान्य नाही. ज्यांना होळकरांचा इतिहास पुढे येऊ द्यायचा नाही, अशा लबाड लांडग्याला आपण लावलं.

सत्तेचा माज चांगला नसतो, प्रशासनाच्या आणि पोलिसांच्या आडून जास्त काळ लढाई करता येत नाही, 31 मे ला मी सांगितलं होतं की, अहिल्यादेवींच्या चौंडीमध्ये राजकारण करु नका, माती झाल्याशिवाय राहणार नाही, आणि वीसच दिवसामध्ये सातारा जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातला मराठा समाजाचा पोरगा, देवेंद्र फडणवीसांच्या साथीनं, नरेंद्र मोदी आणि अमित शाहांच्या आशिर्वादानं देशातलं सर्वात मोठं बंड करतो आणि महाविकास आघाडीचं सरकार घालवतो.

त्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा आशीर्वाद आहे, कारण आपण अनेकवेळा पाहिलं की, या पुण्यभूमीत एक प्रचंड ताकद आहे, म्हणून दोन वर्षांनंतर 300 वी जयंती अखंड जगातली लोकं या ठिकाणी येणार आहेत.आणि ती 300 वी जयंती आपल्याला मोठ्या ताकदीनं मोठ्या संख्येनं, महाराष्ट्रामध्ये उर्जा निर्माण करणारी आपल्याला साजरी करायची आहे. त्याच्या तयारीला आत्तापासूनच लागले पाहिजे असंही आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले.

या चौंडीमध्ये इतकी ऊर्जा आहे की, या चौडीतून अनेक प्रस्थापितांच्या विरोधात लढण्याची ताकद महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या कार्यकर्त्यांना मिळाली. या चौंडीमध्ये येऊन अनेक कार्यकर्ते नेते झाले. अनेक कार्यकर्ते सरपंच, झेडपी मेंबर, आमदार, खासदार मंत्री झाले, अनेक पोरं प्रशासकीय अधिकारी झाली, ही चौंडीची पुण्यभूमी आहे.

यावेळी पडळकर म्हणाले की, फडणवीससाहेब आपण मुख्यमंत्री असतानाही आले होतात,चौंडीवरती तुमचं विशेष प्रेम आहे. येथे आलेला प्रत्येक माणूस दोन गोष्टी कायम लक्षात ठेवतो. एखाद्याने दिलेला सन्मान आणि एखाद्याने केलेला अपमान या दोन गोष्टी महाराष्ट्रातला समाज कायम लक्षात ठेवतो, असेही पडळकर म्हणाले. त्यामुळे या ठिकाणी काही गोष्टींचा उल्लेख होणं गरजेचं आहे,असंही ते म्हणाले.

या राज्यात अनेक सरकारं आली अनेक सरकारं गेली, पण या राज्यामध्ये महाराष्ट्रातल्या धनगर समाजातल्या बाबतीमध्ये एक ओळीचं परिपत्रक कोणत्याही सरकारला काढता आलं नाही, मी आज तुमच्यासमोर दहा पानं घेऊन आलो, ती देवेंद्र फडणवीसांनी काढली असंही ते म्हणाले.

कधी वाचली का आपण काय योजना काढली? असा सवााल उपस्थितांना आमदार पडळकरांनी केला. ते म्हणाले की, समाजामध्ये परिवर्तन कधी होईल, शिक्षणाची जेव्हा आपण कास धरु तेव्हा समाजामध्ये परिवर्तन होईल असंही ते म्हणाले. महाराष्ट्रातल्या तमाम धनगर बांधवांच्या वतीने देवेंद्र फडणवीसांना धन्यवाद देतो की, त्यांनी यामध्ये एक महत्वपू्र्ण योजना यामध्ये आणली की, मेंढपाळांच्या मुलांना महाराष्ट्रातल्या नामांकीत इंग्रजी मेडीयमच्या शाळेमध्ये प्रवेश घेता येईल. त्या शाळांची फी कीती आहे माहित आहे का? एक लाख, दीड लाख, दोन लाख, आज मेंढपाळांची दहा हजार पोरं इंग्रजी मेडीयमच्या शाळेत शिकत आहेत. ही दूरदृष्टी या नेतृत्वामध्ये आहे असेही पडळकर म्हणाले.

Tags

follow us