Download App

गुलाबराव पाटालांकडून अजितदादांना प्रत्युत्तर, ‘सकाळी एका सोबत, दुपारी दुसऱ्यासोबत आणि संध्याकाळी…’

जळगाव : शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिंदे गटातील आमदार पुन्हा निवडून येणार नाहीत असा दावा महाविकास आघाडीकडून केला जातोय. शिवसेनेसोबत ज्यांनी गद्दारी केली त्यांना जनतेने धडा शिकवला असा दावा संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून केला जातो. यासाठी नारायण राणे आणि छगन भुजबळ यांचा दाखला दिला जातो. काल पुण्यात अजित पवार यांनी देखील हाच दावा केला. उध्दव ठाकरे यांना सोडून शिवसेनेतून बाहेर पडलेला एकही आमदार पुन्हा निवडून येणार नाही, अशी टीका अजित पवार यांनी केली होती.

अजित पवारांच्या टिकेला गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. गुलाबराव पाटील म्हणाले, जे सकाळी एका सोबत शपथ घेतात, दुपारी दुसऱ्यासोबत जातात आणि संध्याकाळी तिसऱ्यासोबत सरकार बनवतात त्यांनी आम्हाला सांगण्याची गरज नसल्याची टीका मंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर केली.

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर

अजित पवार यांनी पुण्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटातील आमदारांवर टीका केली होती. उध्दव ठाकरे यांना सोडून शिवसेनेतून बाहेर पडलेला एकही आमदार पुन्हा निवडून येणार नाही, अशी टीका अजित पवार यांनी पुण्यात केली होती. या टिकेला गुलाबराव पाटील यांनी जळगावमध्ये बोलताना प्रत्युत्तर दिलं.

अजित पवार यांच्या बोलण्याकडे मी लक्ष देत नाही. जनता हुशार असल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले. जे सकाळी कुणाबरोबरच शपथ घेतात आणि संध्याकाळी कुणासोबत जातात आणि तिसऱ्या दिवशी कोणासोबत सरकारमध्ये बसतात, त्यांनी या गोष्टी आम्हाला सांगण्याची गरज नाही असे गुलाबराव पाटील म्हणाले.

गद्दारी केली अशी आमच्यावर टीका होते. मात्र, गद्दारी का केली अशी कबुली मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. उध्दव ठाकरे यांना बोललो होतो की, एकनाथ शिंदे यांच्यासारखा मराठा चेहरा, आपल्यापासून लांब जाता कामा नये. आपण त्यांना बोलवले पाहिजे. मात्र, यादरम्यान आम्ही उठाव केला आम्ही मराठा चेहऱ्याच्या मागे उभे राहिलो. हे स्वार्थपणे आणि बिनधास्तपणे सांगतोय, असंही मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितलं.

Tags

follow us