Download App

लुटलेले सोने विकण्यासाठी आला आणि पोलिसांच्या जाळ्यात सापडला

  • Written By: Last Updated:

पुणे जिल्ह्यातील शिरुर येथे जबरी चोरी करतांना गावठी कट्टयातून वृध्दावर गोळीबार करणाऱ्या आरोपीस अहमदनगर – सोलापुर रोड, चाँदणी चौक येथे अहमदनगर एलसीबी टिम’ने वेशांतर करुन सापळ लावून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. मिलींद ऊर्फ मिलन्या ईश्वर भोसले वय 25), कोमल मिलिंद भोसले (वय 20 दोघेही रा. बेलगांव, ता. कर्जत) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत. (He came to sell the looted gold and was caught in the police)

याबाबत अधिक माहिती अशी, वरील नमूद गुन्ह्याच्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना जिल्ह्यातील फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेवुन कारवाई करणे बाबत आदेश दिले होते. आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या.

पथक नगर शहर परिसरात फरार आरोपींची माहिती घेताना आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, आरोपी नामे मिलींद भोसले व त्याची बायको हे घरफोडी चोरीच्या गुन्ह्यातील चोरी केलेले सोने विक्री करण्यासाठी नगर सोलापुर रोडने अहमदनगरच्या दिशेने येत आहे. आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवुन पंचाना सोबत घेवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत मार्गदर्शन केले.

Delhi Crime : दिल्ली हादरली! लग्नाला नकार देणं विद्यार्थीनीला महागात पडलं, लोखंडी रॉडने…

पथकाने लागलीच नगर सोलापुर रोड, चाँदणी चौक, अहमदनगर येथे जावुन वेशांतर करुन सापळ लावुन थांबलेले असताना थोड्याच वेळात बातमीतील वर्णना प्रमाणे एक संशयीत इसम व महिला हातात पिशवी घेवुन येताना दिसले. पथकाची खात्री होताच त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या संशयीतांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1) मिलींद ऊर्फ मिलन्या ईश्वर भोसले वय 25 व 2) कोमल मिलिंद भोसले वय 20 दोन्ही रा. बेलगांव, ता. कर्जत असे सांगितले.

त्यांचेकडे वरील प्रमाणे दाखल गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपुस करता सुरुवातीस त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यांना अधिक विश्वासात घेवुन सखोल चौकशी करता त्याने त्याचा साथीदार नामे अटील ऊर्फ अटल्या ईश्वर भोसले रा. बेलगांव, ता. कर्जत (फरार) अशांनी आलेगाव पागा, ता. शिरुर जिल्हा पुणे येथील जांभळकर वस्तीवर जावुन घरफोडी चोरी केली असुन चोरी केलेले सोने विक्री करण्यासाठी आलो असल्याचे सांगितल्याने त्यास ताब्यात घेतले.

ताब्यातील आरोपी नामे मिलंद भोसले यास त्याने अहमदनगर जिल्ह्यात आणखीन कोठे कोठे व किती गुन्हे केले या बाबत विचारपुस करता त्याने दिलेल्या कबुलीचे अनुषंगाने अहमदनगर जिल्हा गुन्हे अभिलेख पडताळणी करता खालील प्रमाणे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.

Tags

follow us