“कायम घरात बसून चकाट्या पिटणाऱ्यांना कळणार कसे ?” Chitra Wagh यांच Manisha Kayande यानां उत्तर

मुंबई : शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी नितीन गडकरी एका शरीरसौष्ठव स्पर्धेतील फोटो पोस्ट करत “चित्रा वाघ यांना हा नंगाटनाच मान्य आहे का ?” असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर चित्रा वाघ पलटवार करत कायंदेच्या या प्रश्नाला उत्तर देत एक पोस्ट केली आहे. त्यामुळे त्यांच्या या ट्विटरवॉरची सध्या सोशल मीडियात चर्चा रंगली आहे. चित्रा वाघ […]

_LetsUpp (3)

Manisha Kayande & Chitra Wagh_LetsUpp

मुंबई : शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी नितीन गडकरी एका शरीरसौष्ठव स्पर्धेतील फोटो पोस्ट करत “चित्रा वाघ यांना हा नंगाटनाच मान्य आहे का ?” असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर चित्रा वाघ पलटवार करत कायंदेच्या या प्रश्नाला उत्तर देत एक पोस्ट केली आहे. त्यामुळे त्यांच्या या ट्विटरवॉरची सध्या सोशल मीडियात चर्चा रंगली आहे.

चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटरवर याबाबत ट्विट करत “शरीरसौष्ठव स्पर्धा कळतात का तुम्हाला ताई ? असा पलटवार मनीषा कायंदे यांच्यावर केला आहे. आपल्या ट्विटमध्ये त्या पुढे म्हणतात,”खासदार क्रीडा महोत्सव दरवर्षी घेणारे आमचे नेते नितीनजी गडकरी पुरस्कार वितरण करीत आहेत शरीरसौष्ठव स्पर्धेचे. असो.. कायम घरात बसून केवळ चकाट्या पिटणाऱ्यांना ते कळणार तरी कसे?” असा टोला देखील यावेळी वाघ यांनी लगावला आहे.

मनीषा कायंदे यांनी काय ट्विट केलं होत ?

टीव्ही मॉडेल उर्फी जावेदच्या ड्रेसिंगवरून चित्रा वाघ यांनी आक्षेप नोंदवत होता. त्याच मुद्द्यावर शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेतील एक जुना फोटो वापरत चित्रा वाघ यांना प्रश्न विचारला होता. या फोटोमध्ये मंत्री नितीन गडकरी एका शरीर सौष्ठव स्पर्धा विजेत्या महिलेला पुरस्कार देताना दिसत आहेत. तर त्या फोटोवर “चित्रा वाघ यांना हा नंगाटनाच मान्य आहे का ?’ असं लिहलं आहे.

https://twitter.com/KayandeDr/status/1617753824650989568

Exit mobile version