Download App

Nashik Graduate Constituency : मी अपक्ष फॉर्म भरलाय, अपक्षच राहणार

अहमदनगर : मी कोणत्याही पक्षात जाणार नाही. मी अपक्ष उमेदवार आहे त्यामुळे अपक्षच राहणार आहे, असे स्पष्टीकरण नाशिक पदवीधर मतदारसंघाचे (Nashik Graduate Constituency) अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांनी दिले. संगमनेरमध्ये मतदान केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

थोरातसाहेब आजारी आहेत. त्यांच्या खांद्याला फॅक्चर झालाय. डॉक्टरांनी त्यांना संपूर्ण बेडरेस्ट सांगितली आहे. त्यामुळे त्यांना त्रास देण्याची गरज नाही. ते आमचे कुटुंब प्रमुख आहेत. योग्य वेळ आल्यावर त्यांच्याशी चर्चा करणार आहे, असे सत्यजित तांबे म्हणाले.

तांबे म्हणाले, गेल्या दहा दिवसांत आमच्या कुटुंबाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केलं. आणि अर्धसत्य ठेऊन एकच बाजू मांडली गेली त्यावर सविस्तर निवडणुक झाल्यावर बोलणार आहे.

शंभरपेक्षा जास्त संघटनांनी मला पाठिंबा दिला आहे. चांगला उमेदवार म्हणून लोक पाठिशी उभा राहत असतील तर त्याच्यामध्ये आनंद आहे, असे तांबे म्हणाले.

नाशिक पदवीधर निवडणुकीत माझा विजय झालेला आहे. आता फक्त उत्सुकता याचीच आहे की मताधिक्य किती होतंय, असे सत्यजित तांबे म्हणाले.

गेल्या चौदा वर्षापासून माझे वडील नाशिक पदवीधर मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. या काळात आमच्या कुटुंबाचे मतदारांशी ऋणानुबंध जुळले आहेत. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी झाली. सगळ्याच पक्षाचे कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत, असा दावा अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी केला.

विविध पक्षांचे कार्यकर्ते आमच्यासोबत आहेत. शंभरपेक्षा जास्त संघटनांचा मला पाठिंबा मिळाला आहे. लोकांचा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला. येणाऱ्या काळात त्यांचा विश्वास सार्थ करण्याचा प्रयत्न करीन, असे सत्यजित तांबे म्हणाले.

Tags

follow us