नाशिक : त्र्यंबकेश्वरच्या शिवपिंडीवर काही दिवसांपूर्वी बर्फ जमा होत असल्याचे समोर आले होते. मात्र हा जमा झालेला बर्फ पुजाऱ्यांनी केलेला बनाव असल्याचे चौकशी समितीत उघड झाले आहे. या प्रकरणी पुजाऱ्यासह ट्रस्टच्या दोघांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील पिंडीवर बर्फ जमा झाल्याचा बनाव केल्याप्रकरणी देवस्थान समितीच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली. दरम्यान, 30 जून 2022 रोजी पहाटे त्र्यंबकेश्वर मंदिरातील पिंडीवर बर्फ आढळल्याचं समोर आलं होतं. दरम्यान, त्र्यंबकेश्वरचे हवामान आणि गर्भगृहातील तापमान पहाता बर्फ कसा तयार झाला? यावर अनेकांनी शंका उपस्थित केली होती. त्यावर सत्यशोधन समिती गठित करून सीसीटीव्ही फूटेजची पाहणी करण्यात आली.
दरम्यान चौकशी समितीत धक्कादायक माहीती समोर आलं असून त्यात तुंगार ट्रस्टच्या तिघांनीच पिंडीवर हा बर्फ ठेवल्याचं समोर आले आहे. अमरनाथ प्रमाणेच त्र्यंबकेश्वरलाही बर्फ तयार झाला असा खोटा प्रचार केल्याचा ठपका सुशांत तुंगार, आकाश तुंगार आणि उल्हास तुंगार यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
’50 खोके’ चा केक कापत Jitendra Awhad यांनी मुख्यमंत्र्यांना डिवचले
त्र्यंबकेश्वर मंदिरातल्या शंकराच्या पिंडीवर बर्फाचे थर जमा झाल्याची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली होती. याचा व्हिडीओ सध्या बराच चर्चेत आला होता. मात्र हा पिंडीवर बर्फ जमा झाल्याची घटना निव्वळ बनाव असल्याचे उघड झाले आहे.