Download App

नगर जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी, काँग्रेसच मुख्यमंत्र्यांना निवेदन तर गृहमंत्र्यांना आव्हान

  • Written By: Last Updated:

Ahmednagar Crime News : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यासह नगर शहरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. खून, दरोडे, हत्याकांड, अवैध धंदे, तसेच जमिनीवर बेकायदेशीर ताबे मारणे, राजकीय वरदहस्तातून टोळी युद्ध सुरू आहे. यामुळे जिल्ह्याची प्रतिमा मलीन होऊ लागली आहे. या प्रकरणामुळे नगर शहराचा विकासाला बाधा निर्माण होत आहे. गुन्हेगारी घटनांमुळे सर्वसामान्य नागरिक प्रचंड भयभीत झाले असून आता याप्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. नगर शहरातील या राजकीय गुन्हेगारांच्या मुसक्या आवळा, अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे काँग्रेसच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केली आहे. (Crime in the district… It is the Congress that gives a statement to the Chief Minister and a challenge to the Home Minister)

याबाबत बोलताना काळे म्हणाले की, सावेडी उपनगर परिसरासह शहरात अनेक ठिकाणी अलीकडच्या काळात नागरिकांच्या जमिनी जबरदस्तीने बळकावणे, अवैद्य धंद्यांवरून टोळी युद्ध सुरू असल्याचा प्रकार सध्या सुरु आहे. राजकीय पाठबळाच्या माध्यमातून शहराला वेठीस धरले जात आहे. या गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची पोलीस केवळ कागदोपत्री पूर्तता करत आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात गुन्हेगारांवर वचक राहिलेला नाही. जिल्ह्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.

कायदा – सुव्यवस्थेसाठी गृहमंत्र्यांनी मैदानात उतरावे
नगर शहरातील वाढती गुन्हेगारीच्या पार्शवभूमीवर भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी गृहमंत्र्यांना निवेदन दिले आहे. तरी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता स्वतः नगरच्या मैदानात उतरत गुन्हेगारांना त्यांची जागा दाखवून द्यावी, असे जाहीर आव्हान काँग्रेसने केले आहे. मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलेल्या निवेदनाची प्रत गृह मंत्र्यांना देखील पाठवण्यात आली आहे.

विरोधी पक्षनेतेपदासाठी संग्राम थोपटेंनी थोपटले दंड; थेट दिल्लीत लावली फिल्डिंग

जिल्ह्याला दबंग अधिकाऱ्याची गरज
नगर शहरासह जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी आता जिल्ह्याला दबंग पोलीस अधिकाऱ्याची गरज आहे. जिल्ह्याला त्यावेळी तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक विश्वासराव नांगरे पाटील, कृष्णा प्रकाश यांच्यासारख्या दबंग अधिकाऱ्याची गरज आहे. दरम्यान सध्याची जिल्ह्याची भयावह परिस्थिती पाहता जिल्ह्याला दबंग एसपींची गरज असल्यासची भावना किरण काळेंनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात व्यक्त केली आहे.

शहरात तरुणावर प्राणघातक हल्ला
अहमदनगर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अंकुश चत्तर यांच्यावर सावेडीतील एकविरा चौकात काल (शनिवारी) रात्री उशिरा प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्याप्रकरणी भाजपच्या एका पदाधिकाऱ्यासह आठ ते दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेमुळे नगर शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Tags

follow us