Download App

Rajmal Lakhichand Jewelers वर राजकीय दबावतून कारवाई? ईश्वरलाल जैन म्हणाले…

ED on Rajmal Lakhichand Jwelers Jalgaon : ‘ईडी कारवाई (ED ) झाली म्हणून राजमल लखीचंद ज्वेलर्स ( Rajmal Lakhichand Jwelers ) समूह हा कायमचा बंद पडणार नाही. 168 वर्षांची तपश्चर्या अशी वाया जाणार नाही. आर. एल.ज्वेलर्स उद्योग समूह मित्रांच्या हितचिंतकांच्या मदतीने पुन्हा नव्या जोमाने सुरू करणार.’ असं म्हणत राजमल लखीचंद ज्वेलर्स समूहाचे मालक ईश्वरलाल जैन ( Ishwarlal Jain ) यांनी विश्वास व्यक्त केला आहे. त्याचबरोबर राजकीय दबावतून ही कारवाई झाली. असं मला वाटत नाही. कारण तसा कुठलाही पुरावा नाही. त्यामुळे विना पुरावा असं बोलणं उचित ठरणार नाही. असं ते म्हणाले.

‘आता ‘सामना’ची आग विझवावीच लागेल’; फडणवीसांवरील टीका बावनकुळेंनाही झोंबली!

राज्यात सध्या ईडीच्या कारवाया वाढल्या आहेत. त्यात जळगावात माजी आमदार मनिष जैन आणि माजी खासदार ईश्वर जैन यांच्या मालकीच्या राजमल लखीचंद ज्वेलर्सवर ईडीच्या पथकाने कारवाई करत चौकशी केली. त्यावर आता राजमल लखीचंद ज्वेलर्स समूहाचे मालक ईश्वरलाल जैन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ना ईडी, ना मनोमिलन… अजितदादा-शरद पवारांची भेट चोरडियांच्या ‘3 हजार’ कोटींच्या टीडीआरसाठी?

काय म्हणाले ईश्वरलाल जैन?

या ईडी कारवाई प्रकरणी प्रतिक्रिया देताना ईश्वरलाल जैन म्हणाले की, ईडीची कारवाई झाली. म्हणून राजमल लखीचंद ज्वेलर्स समूह हा कायमचा बंद पडणार नाही.168 वर्षांची तपश्चर्या अशी वाया जाणार नाही आर. एल.ज्वेलर्स उद्योग समूह मित्रांच्या हितचिंतकांच्या मदतीने पुन्हा नव्या जोमाने सुरू करणार. ईडीची ही कारवाई चुकीची आहे. मात्र त्याबाबत कायदेशीर पद्धतीने लढा दिला जाईल. आम्ही काही चुकीचे केलेले नाही. त्यामुळे आम्ही समन्स बजावल्यानुसार चौकशीसाठी जाणार आहोत. राजकीय दबावतून ही कारवाई झाली. असं मला वाटत नाही. कारण तसा कुठलाही पुरावा नाही. त्यामुळे विना पुरावा असं बोलणं उचित ठरणार नाही. असं ते म्हणाले.

कशी झाली कारवाई?

गुरुवारी सकाळी सात वाजल्यापासूनच राजमल लखीचंद ज्वेलर्स समूहावर कारवाई सुरू झाली होती. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असेलली कारवाई आज पहाटे संपली. यामध्ये राजमल लखीचंद ज्वेलर्स समूहाचे जळगाव शहरातील मुख्य जे शोरूम आहे. त्या ठिकाणाहून 87 लाखांची रोकड आणि त्याठिकाणी विक्रीसाठी असलेले सर्व दागिने जप्त करण्यात आले आहेत.

या प्रकरणात राजमल लखीचंद ज्वेलर्स समूहाचे मालक ईश्वरलाल जैन यांच्या पत्नी तसेच मनीष जैन व त्यांच्या पत्नी अशा चार जणांना ईडीच्यावतीने समन्स बजावण्यात आलेले आहेत. त्यावर ईडीची ही कारवाई चुकीची आहे. मात्र त्याबाबत कायदेशीर पद्धतीने लढा दिला जाईल. आम्ही काही चुकीचे केलेले नाही. त्यामुळे आम्ही समन्स बजावल्यानुसार चौकशीसाठी जाणार आहोत. असं जैन म्हणाले आहेत.

Tags

follow us