Download App

राम शिंदे- रोहित पवार यांना कर्जत आणि जामखेड बाजार समित्यांत समसमान जागा, कोणाचा होणार सभापती?

Jamkhed Market Committee Election results : जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पार पडली आहे. धक्कादायक निकाल समोर आला असून राष्ट्रवादीचे ९ तर भाजपचे ९ समसमान उमेदवार निवडून आले आहेत. तशीच परिस्थिती कर्जत बाजार समिती निवडणूकीतही झाली. तेथंही समसमान उमेदवार निवडून आले.  त्यामुळं आता कोणत्या गटाचा सभातपी होणार, याविषयी जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.

दि ३० रोजी जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागेसाठी ९८.४३ टक्के मतदान झाले. बाजार समिती निवडणुकीत सत्ताधारी आमदार राम शिंदे व आमदार रोहित पवार यांनी समोरासमोर पॅनल उभे करून निवडणुकीत अत्यंत चुरस निर्माण केली होती.

दोन्ही पॅनलने विजयाचे दावे केले होते, मात्र मतदारांनी आमदार रोहित पवारांच्या सहकार व शेतकरी विकास आघाडी पॅनलला ९ जागा तर आमदार राम शिंदेच्या स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनलला ९ जागेवर विजय मिळवून दिला आहे.

विजयी झालेले उमेदवार पुढील प्रमाणे
सुधीर राळेभात,कैलास वराट,अंकुश ढवळे,सतिश शिंदे (सर्व राष्ट्रवादी) तर गौतम उतेकर ,सचिन घुमरे,विष्णू भोंडवे. (सर्व भाजप) तर सोसायटी मतदार संघ महिला राखीवमध्ये रतन चव्हाण,अनिता शिंदे,(सर्व राष्ट्रवादी),विमुक्त जाती/भटक्या जमाती मध्ये नारायण जायभाय (राष्ट्रवादी) इतर मागास वर्गीयमध्ये डॉ गणेश जगताप (भाजप),ग्रामपंचायत मतदार संघ सर्वसाधारणमध्ये शरद कार्ले,वैजिनाथ पाटील (भाजप) अनुसूचित जाती/जमातीमध्ये सीताराम ससाणे (भाजप),आर्थिक दुर्बल घटकमध्ये नंदकुमार गोरे (भाजप) हमाल/मापाडी मतदार संघामध्ये रवींद्र हुलगुंडे व्यापारी/आडते मतदार संघातुन सुरेश पवार,राहुल बेदमुथा (राष्ट्रवादी)असे निवडून आले आहेत

आ. राम शिंदे पॅनलचे विजयी झालेले उमेदवार
गौतम उतेकर ,सचिन घुमरे, विष्णू भोंडवे, डॉ गणेश जगताप, शरद कार्ले, वैजिनाथ पाटील, सीताराम ससाणे, नंदकुमार गोरे, रवींद्र हुलगुंडे

आ. रोहित पवार पॅनलचे विजयी झालेले उमेदवार :
सुधीर राळेभात, कैलास वराट, अंकुश ढवळे, सतिश शिंदे , रतन चव्हाण, अनिता शिंदे, नारायण जयभाय, सुरेश पवार, राहुल बेदमुथा,

तर कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकालही असाच लागला होता. 18 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत 9 जागांवर शिंदे गटाचे उमेदवार निवडून आले होते. तर उर्वरित 9 जागांवर रोहित पवार गटाचे उमेदवार विजयी झाले. त्यामुळं आता कर्जत आणि जामखेडमध्ये सभापती आणि उपसभापती कोणत्या गटाचा होणार, हेच पाहणं महत्वाचं आहे.

 

Tags

follow us