अहमदनगर – यंदा राज्यात विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha elections) होणार आहेत. या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यात महायुतीच्या मेळाव्याचे (Mahayuti meeting) आयोजन रविवार (दि १४ जानेवारी) रोजी आयोजित आले असून, महायुतीच्या घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. महायुतीच्या मेळाव्यातून नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पुन्हा पंतप्रधान करण्याच्या निर्णयावर घटक पक्ष निर्धार करतील असा विश्वास खा .डॉ सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला.
राज्यातील ३६ जिल्ह्यात एकाच दिवशी महायुतीच्या मेळाव्याचे आयोजन करण्याचा निर्णय नेत्यांनी जाहीर केला होता. त्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे डॉ सुजय विखे पाटील आणि आ.संग्राम जगताप यांनी सांगितले.
सोलापूर लोकसभा : वर्तुळ पूर्ण करण्यासाठी प्रणिती शिंदे सज्ज, भाजपची शोधमोहिम पुन्हा सुरु!
या मेळाव्याची महायुतीतील घटक जय्यत तयारी आहेत. पालकमंत्री विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी सुरू आहे. नगर शहरातील बंधन लॉन्समध्ये सकाळी ११ वाजता जिल्ह्याचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे.
महामेळाव्याच्या निमिताने मंत्री विखे पाटील आणि आ.संग्राम जगताप यांनी महावेळाच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याचा निर्धार करतानाच राज्यात ४५ हून अधिक जागा जिंकण्याचे उद्दीष्ट ठेवून महायुती काम करणार असल्याचे सांगितले.
पालकमंत्री विखे पाटील यांनी नगर आणि श्रीरामपूर येथे घटक पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेऊन महामेळाव्याची तयारी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. रविवारच्या मेळाव्यात सर्व पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचं सांगून महायुतीमध्ये चांगला समन्वय असल्याचं खा. विखे पाटील आणि संग्राम जगताप यांना सांगितले.
आ जगताप म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत राज्यातून ४५ जागा जिंकण्याचा संकल्प घेऊन जिल्हास्तरावर समन्वय समिती नेमण्यात आली आहे. आगामी काळात एकत्रितपणे महायुतीतील सर्व घटक पक्ष नियोजन करणार असल्याचे याप्रंसंगी ते म्हणाले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, राष्ट्रवादीचे प्रशांत गायकवाड, शिवसेनेचे बाबूशेठ टायरवाले यांच्यासह उत्तर नगर जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष कपिल पवार उपस्थित होते.