Download App

.. म्हणून सरकारकडून देशात जातीय तणाव ; भालचंद्र कानगोंचा गंभीर आरोप

Ahmednagar News :  केंद्रातील भाजप सरकार भांडवलदार हिताचे आर्थिक धोरण राबवत आहे. दुसरीकडे महागाई, आर्थिक व सामाजिक विषमतेचा सर्वसामान्य नागरिक सामना करत आहे. देशाची संपत्ती भांडवलदारांच्या स्वाधीन करण्यासाठी सरकारकडून जातीय तणाव निर्माण केला जातो. बेरोजगारीमुळे युवकांमध्ये असंतोष आहे. जनता त्रस्त बीजेपी मस्त ही देशाची वस्तुस्थिती झाली आहे. जनतेवर हिंदुत्व लादण्यासाठी घटनेचा गैरवापर सुरू आहे, असा गंभीर आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव डॉ. भालचंद्र कानगो (Bhalchandra Kango) यांनी केला.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या बुरुडगाव रोड येथील पक्ष कार्यालयात ‘भाजप हटाव देश बचाव’ जनजागरण मोहिमेच्या पार्श्‍वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत कानगो बोलत होते. भाकपचे राज्यसचिव अ‍ॅड. सुभाष लांडे, जिल्हा सचिव बन्सी सातपुते, राज्य सचिव मंडळ सदस्या स्मिता पानसरे, जिल्हा सहसचिव अ‍ॅड. सुधीर टोकेकर आदी उपस्थित होते.

Sharad Pawar… आता सुप्रिया सुळे नॉट रिचेबल आहेत का?

डॉ. कानगो म्हणाले, भारतीय कम्युनिस्ट पक्षाने सर्व डाव्या चळवळीतील पक्ष, संघटनांना बरोबर घेऊन ही जनजागरण मोहीम सुरू केली आहे. याला भाजप विरोधी इतर राजकीय पक्षांचा देखील पाठिंबा आहे. देशात आज भाजपची ताकद नाही. तोडून-फोडून सरकार राज्यात आणण्याचे काम केले जात आहे. महाराष्ट्रप्रमाणे इतर राज्यातही अशा पद्धतीने सत्ता ताब्यात ठेवण्यात आली आहे. ईडी व सीबीआयचा वापर करुन विरोधकांमध्ये धाक निर्माण करण्यात आला आहे.

शेतीचा खर्च वाढला, मात्र, मालाला भाव नाही, सरकार योग्य हमीभाव देण्यास तयार नाही. यामुळे शेतकर्‍यांमध्ये असंतोष आहे. नवीन कामगार कायद्यामुळे कामगार भांडवलदारांच्या दावणीला बांधले जात आहे. याबाबत सर्वसामान्य नागरिकांना जागरूक करण्याचे काम या मोहिमेतून होणार आहे.’

Sharad Pawar यांच्या अदानींबद्दलच्या भूमिकेवर संजय राऊत म्हणाले…

प्रास्ताविकात संतोष खोडदे यांनी भाजप हटाव देश बचाव ही देशव्यापी मोहीम नगर जिल्ह्यातील जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी सुरू असलेल्या कार्याची माहिती दिली. यावेळी उपस्थितांच्या हस्ते या मोहिमेच्या प्रचारपत्रकांचे अनावरण करण्यात आले.

बन्सी सातपुते म्हणाले, ‘स्वातंत्र्यानंतर १९४९ साली पहिल्यांदा शेतकरी वर्गावर गोळीबार होऊन शेतकरी शहीद झालेल्या नगर जिल्ह्यातील एरंडगाव (ता. शेवगाव) येथून या मोहिमेचा प्रारंभ, तर राजापूर (संगमनेर) येथे १५ मे रोजी याचा समारोप होणार आहे. या मोहिमेचा प्रचार-प्रसार गावोगावी जाऊन केला जाणार आहे.’

 

Tags

follow us