Download App

मराठा आरक्षणावर विखे पाटलांचे मोठे विधान; म्हणाले, सरकार आरक्षणाबाबत अत्यंत..

Radhakrishna Vikhe on Maratha Reservation : राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली पुनर्विचार याचिका न्यायालयाने फेटाळली. त्यानंतर विरोधी पक्षांनी राज्य सरकारच्या कारभारावर टीकेची झोड उठविली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषदेत जोरदार टीकास्त्र सोडले होते. त्यानंतर आज राज्याचे महसूलमंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत मोठे विधान केले आहे.

मंत्री विखे यांनी आज नगरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांनी मराठा आरक्षणाबाबत प्रश्न विचारला. त्यावर विखे म्हणाले, ‘मराठा आरक्षणाबाबत सरकार गंभीर आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने बैठक बोलावली आहे.

‘मागच्या सरकारच्या काळात या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याचा परिणाम सगळ्यांनी पाहिला आहे. साधे वकिलाचे पैसे देखील देऊ शकलो नाही हा एक प्रकारचा निष्काळजीपणाचा कळस आहे. मराठा आरक्षण मिळण्यासंदर्भात थोडासा विलंब होऊ शकतो कारण ती न्यायालयीन प्रक्रिया आहे मात्र, आमचे सकारात्मक प्रयत्न सुरू आहेत.’

जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवारांना बाप मानले…आमदार शिरसाटांचा हल्लाबोल

 

निकाल होतात मॅनेज – राऊत 

न्यायालयात अन्य निकाल मॅनेज होतात मग राज्यातील एका महत्वाच्या समाजासाठी असलेल्या आरक्षणाचा निकाल आपल्या मनासारखा का लागत नाही असा सवाल त्यांनी केला होता. फडणवीस सत्तेत नसताना म्हणाले होते, की सत्तेत आल्यास दोन दिवसांत आरक्षण दिले जाईल. मग आता गेल्या नऊ महिन्यांपासून त्यांच्या हातात सत्ता आहे. अशा वेळी महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न असो की मराठा आरक्षण कोणताच निकाल मनासारखा लागत नाही. याचे कारण काय ? या विषयावर तुमची दातखिळ का बसली आहे ? असा सवाल राऊत यांनी केला. आमच्या हातातून धनुष्यबाण काढून घेताना तुमच्या हालचाली बरोबर घडतात मग मराठा आरक्षणाच्या बाबतीत तुम्ही कुठे कमी पडलात हे जनतेला एकदा सांगा, असे आव्हान राऊत यांनी दिले होते.

Tags

follow us