Download App

शिर्डी विमानतळासाठी 650 कोटी; फडणवीसांनी सांगितलं काय-काय बदलणार?

Ahmednagar News : शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंगसाठी एप्रिल महिन्यात चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाल्याचे सांगण्यात आले पण आता चार महिने उलटून गेले तरीही नाईट लँडिंग सुरू झालेली नाही. नाईट लँडिंग का सुरू होत नाही?, त्यात काही अडचणी आहेत का? आघाडी सरकार असताना तिथल्या टर्मिनल आणि अन्य सोयी सुविधांकरता दीडशे कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता. पण आता सगळच थांबलं आहे. त्यावर तत्काळ उपाययोना करून नाईट लँडिंग सुरू करावी अशी मागणी काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात यांनी विधीमंडळ अधिवेशनात केली.

Manipur महिलांवरील अत्याचाराचा व्हिडीओ पाहून कलाकारांनी व्यक्त केला संताप, ट्वीट करत म्हणाले…

नाईट लँडिंगसाठी आपल्याला परवानगी मिळाली आहे. मात्र त्यात काही अटी टाकल्या गेल्या आहेत. त्या अटींची पूर्तता करावी लागणार आहे. आता सध्या नाईट लँडिंग सुरू आहे. पण प्रत्येक वेळी त्यासाठी परवानगी घ्यावी लागते. पण आता नियमित परवानगी आपल्याला लवकरच मिळेल अशी परिस्थिती आहे.

दुसरे म्हणजे शिर्डी विमानतळावर टर्मिनल बांधकामासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. त्यासाठी टेंडरही काढले आहे. त्यामुळे साडे सहाशे कोटी रुपयांची अद्ययावर टर्मिनल बिल्डिंग लवकरच तयार होईल. टर्मिनल इमारतीचे बांधकाम पावसानंतर एक दोन महिन्यात सुरू केले जाईल. बिल्डिंगचे बांधकाम होईपर्यंत प्रवाशांना थांबण्यासाठी आणखी नवी जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शिर्डी विमानतळावर कायमस्वरुपी नाईट लँडिंगची परवानगी मिळावी यासाठी केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याबरोबर बैठक घेऊ असे फडणवीस म्हणाले.

https://letsupp.com/maharashtra/north-maharashtra/ahmednagar-district-divide-issue-maharashtra-monsoon-assembly-session-2023-mla-lahu-kanade-70297.html

अनिल अंबानींच्या कंपनीला काम देऊ नका – चव्हाण

अनिल अंबानी यांच्याकडे लातूर नांदेड बारामती यवतमाळ येथील विमानतळांचा ठेका काढून घ्यावा, अशी मागणी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केली. अनिल अंबानी यांनी ब्रिटेनच्या न्यायालयात दिवाळखोरी जाहीर केली. सन २००८ पासून अंबानी यांना राज्यातील पाच विमानतळ ३० वर्षांसाठी दिले आहेत. पण गेल्या काही वर्षापासून अनिल अंबानी यांच्या ग्रुपने या विमानतळांचा मेंटनन्स केलेला नाही. यामुळे यांचे लायसन्स रद्द करा, अशी मागणी चव्हाण यांनी केली. त्यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, अनिल अंबानी ग्रुपने या विमानतळाचा मेंटनन्स केलेला नाही. एवढच नाही तर त्यानी शासनाचा कुठलाही कर भरलेला नाही. या सर्व बाबी पाहता या विमानतळांचा ताबा एकतर्फी सरकाकडे घेता येतो का, याचा आढावा लवकरच घेऊन त्यानुसार कार्यवाही करण्यात येईल.

Tags

follow us