Download App

फडणवीसांनी पटोलेंबरोबर राऊतांनाही ओढलं; म्हणाले, हे लोक नुसतेच बोलघेवडे

Devendra Fadnavis Criticized Nana Patole : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लवकर होईल असे सांगण्यात येत आहे. यासाठी राज्य सरकारने हालचालीही सुरू केल्याचेही सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात मात्र, मंत्रिमंडळाचा विस्तार अजूनही झालेला नाही. यावर काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी सरकारला घेरत टीका केली होती. त्यावर फडणवीस यांनी जोरदार टीका केली.

फडणवीस आज विविध विकासकामांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने नगरमध्ये आले होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि नाना पटोले यांना चांगलेच फैलावर घेतले.

https://www.youtube.com/watch?v=q6idKwctPBA

नाना पटोले यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत केलेल्या वक्तव्यावर पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला त्यावर फडणवीस म्हणाले, नाना पटोले, संजय राऊत हे बोलघेवडे लोक आहेत. तुम्हाला काम पाहिजे म्हणून ते बोलतात. आम्हाला खूप कामं आहेत म्हणून आम्ही त्यांना उत्तरं देत नाहीत.

मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावरही फडणवीसांनी भाष्य केले. फडणवीस म्हणाले, मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच होईल.  जागावाटपाबाबत बैठक झाली असून आम्ही 22 जागांवर दावा करू असे वक्तव्य शिंदे गटाचे खासदार गजानन किर्तीकर यांनी केले होते. त्यावर फडणवीस म्हणाले, आमच्याकडे कोणताही वाद नाही. आम्ही समन्वयाने काम करतोय. जागावाटपाबाबत सर्वकाही ठरल्यावर तुम्हालाही नक्कीच सांगू.

अधिवेशनाआधी मंत्रिमंडळाचा विस्तार – केसरकर 

राज्य सरकारच्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारावरही त्यांनी भाष्य केले. अधिवेशन सुरू होण्याआधी मंत्र्यांना त्यांच्या विभागांची तयारी करण्यासाठी वेळ मिळाला पाहिजे. त्यामुळे अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार हे शंभर टक्के. पण किती आधी होईल हे ठरविण्यात येईल आणि ते करतील. फक्त याबाबत निश्चित तारीख आता सांगता येणार नाही. परंतु, मंत्रिमंडळाचा विस्तार होणार हे शंभर टक्के खरं आहे.

Video : “वाद असले तरी वादळ नाही” : राम शिंदे अन् विखे पाटलांना जवळ घेत फडणवीसांचा ‘खास’ मेसेज

Tags

follow us