Download App

Video : गडकरींच्या खात्यावर फडणवीसांचा डोळा?; शायराना अंदाजातून सांगितली सुप्त इच्छा

Devendra Fadnavis Shayari In Shirdi : समृद्धी महामार्गाच्या मुंबई ते शिर्डी या दुसऱ्या टप्प्याचं मुख्यमंत्री शिंदे, देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी फडणवीसांचा शायराना अंदाज उपस्थिताना पुन्हा एकदा अनुभवता आला. मात्र, फडणवीसांनी सादर केलेल्या शायरीतून आता फडणवीसांना केंद्राचे वेध लागल्याच्या चर्चांना सुरूवात झाली आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) जर केंद्रात गेले तर, त्यांना कोणत्या खात्याचं काम बघायला आवडेल याचे संकेतही दिले आहेत.

काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार अशा चर्चांना उत आला होता. त्यानंतर आता शिर्डीतील कार्यक्रमात फडणवीसांनी केलेल्या शायरीमुळे आता पुन्हा एकदा फडणवीस केंद्रात काम करण्यास इच्छूक असल्याचे संकेत मिळत आहेत.

शायरी सादर करताना फडणवीस म्हणाले की, ”अंदाज कुछ अलग ही है मेरे सोचने का, सबको मंजिलो का शौक है और मुझे रास्ते बना ने का” अशी शायरी यावेळी फडणवीसांनी सादर केली. त्याला उपस्थितांना टाळ्या वाजवत दादही दिली. मात्र, या शायरीतील शब्द बारकाईने ऐकल्यास फडणवीसांचा डोळा सध्या नितीन गडकरी केंद्रात सांभाळत असलेल्या रस्ते विकास आणि परिवहन खात्यावर तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

तिसऱ्या टप्प्याचे लोकार्पण मुंबईपर्यंत

अनेक लोकांनी या महामार्गाला विरोध केला. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी छत्रपती संभाजीनगरच्या सभेत महामार्गाला विरोध केला. शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगितलं की हे शक्य नाही. ज्या गावात विरोधकांनी सभा घेऊन सांगितलं की हा मार्ग होऊ देणार नाही. त्याच गावात जाऊन एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी लोक जमीन द्यायला तयार आहेत, अशाप्रकारचे पत्र जमा केले. त्या गावात पहिली रजिस्ट्री केल्याचे फडणवीस म्हणाले.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, येत्या ६ ते ८ महिन्यात संपूर्ण मार्ग सुरू होईल. तिसऱ्या टप्प्याचे जेव्हा लोकार्पण होईल तेव्हा तो थेट मुंबईपर्यंत जाईल असा विश्वासही यावेळी फडणवीसांनी व्यक्त केला. राज्याचा विकास करायचा असेल तर राज्याचा मागास भाग मुंबईशी जोडणे आवश्यक होते. अनेक लोकांना हे स्वप्न आणि फक्त घोषणा वाटायची, पण मला आणि एकनाथ शिंदे यांना विश्वास होता की हे काम रेकॉर्ड टाईमवर पूर्ण होईल.

 

शरद पवारांची सभा मणिपूरध्ये ठेवली तर…; फडणवीसांनी विरोधकांना डिवचलं

हा देशातील विक्रमच

गेल्या डिसेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शिर्डी ते नागपूर दरम्यानच्या 520 किमी लांबीच्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. त्यानंतर आज प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले आहे. यामुळे नागपूर ते इगतपुरी तालुक्यातील भरवीर गावापर्यंतचा एकूण ६०० किमीचा रस्ता खुला झाला आहे. या महामार्गासाठी ७०१ किमी जमीन ९ महिन्यात संपादन केली. यासाठी अधिकाऱ्यांनी प्रचंड मेहनत केली, असे  सांगताना हा देशातील विक्रमच असल्याचे फडणवीस म्हणाले.

Tags

follow us