Download App

चर्चा तर होणारच! थोरातांचे भावी मुख्यमंत्र्यांचे बॅनर लागले, विखेंनी दिल्या खोचक शुभेच्छा

Sujay Vikhe Speak on Balasaheb Thorat : राज्यात आगामी काळात विधानसभा व लोकसभा निवडणुका या होणार आहे. या निवडणुकांपूर्वीच काही उत्साही कार्यकर्त्यांकडून आपल्या नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकवण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्यानंतर आता भावी मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचे बॅनर झळकले. यावर आता थोरात यांचे कट्टर राजकीय विरोधक महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी खोचक टोलेबाजी केली आहे.

खासदार सुजय विखे हे आज जिल्हा रुग्णालयात आले होते. यावेळी त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली. यावेळी जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा यावेळी त्यांनी घेतला. यावेळी पत्रकारांनी त्यांना थोरातांच्या भावी मुख्यमंत्री उल्लेख असलेल्या बॅनरबाबत प्रश्न विचारला. त्यावर विखे म्हणाले, थोरात काही माझ्या पक्षातील नाही. मात्र मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत त्यांचा नंबर लागला तर त्यांना माझ्या शुभेच्छा असा खोचक टोला त्यांनी लगावला.

“आम्ही कुणाच्या घरात घुसत नाही; पण, घुसलोच तर…” : फडणवीसांचा ठाकरेंना इशारा

श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर गावात काँग्रेसचे माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख असलेले बॅनर्स कार्यकर्त्यांनी लावले होते. थोरातांचे या पोस्टरमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

या नेत्यांचेही लागले होते बॅनर

थोरात यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून कार्यकर्त्यानी फलक लावला असला तरी थोरात ज्या महाविकास आघाडीत आहेत तेथे आधीच अनेक इच्छुक आहेत. कारण याआधी अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर झळकले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदासाठी मोठी स्पर्धा आहेत. त्यात आता बाळासाहेब थोरातांची भर पडली आहे.

शंभर टक्के मंत्री म्हणून शपथ घेणार, आमदार संतोष बांगरांचा मंत्रीपदावर दावा, शिंदेंचं टेन्शन वाढलं

Tags

follow us