Download App

लोकसभेसाठी कोण, विखे की शिंदे ? ; राधाकृष्ण विखे म्हणाले, 2024 मध्ये..

Radhakrishna Vikhe : भाजपचे विधानपरिषदेतील आमदार प्रा. राम शिंदे यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त करत नगर जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्या या वक्तव्याचा सर्वाधिक धक्का विखे यांनाच बसला आहे. कारण, दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे डॉ. सुजय विखे (Sujay Vikhe) हे खासदार आहेत. त्यांनी पुन्हा खासदारकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

पक्षात कुणीही विरोधक नाही असे समजून त्यांनी रणनिती आखण्यास सुरुवात केली होती. मात्र, काही दिवसांपूर्वी नगरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत राम शिंदे यांनी लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केल्याने विखे यांची डोकेदुखी वाढली आहे.

राम शिंदेंनी विखेंना आणले टेन्शन; नगरमधून लोकसभा लढण्याची तयारी

जिल्ह्यातील या बदलत्या राजकीय घडामोडी काही नवी समीकरणे तर तयार होत नाहीत ना, याचे संकेत देत आहेत. याबाबत आज जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) पाटील यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली. मंत्री विखे म्हणाले, ‘2024 ला विक्रमी मतांनी पक्षाच्या जागा निवडून आल्या पाहिजेत. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजेत यासाठी ज्या ज्या लोकांचे प्रयत्न असतील त्यांचे स्वागत केले पाहजे.’

शिंदे काय म्हणाले ?

2014 मध्ये आमदार असताना लोकसभा लढविण्याचे पक्षाकडून विचारण्यात आले होते. त्यावेळी प्रताप ढाकणे हेही इच्छूक होते. त्यावेळी दिलीप गांधी यांना पक्षाने उमेदवारी दिली होती. 2019 मध्ये मंत्री व नगरचा पालकमंत्री असतानाही पक्षातील नेत्यांनी लोकसभा लढविण्यास विचारले होते. काही विरोधी पक्षाची भूमिकाही माझ्या बाजूने होती. परंतु राजकीय परिस्थितीमुळे राधाकृष्ण विखे व सुजय विखे हे पक्षात आले.

सुजय विखेंना निवडून आणण्यासाठी मला मदत करावी लागली. मला पक्ष राज्यसभेवर पाठविणार होता. त्यासाठी तयारी केली होती. परंतु पक्षाने मला विधानपरिषदेवर संधी दिली आहे. 2024 ची लोकसभा निवडणूक लढण्याची माझी तयारी आहे. पक्षाचा आदेश मी मानणार आहे. लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा असल्याचे राम शिंदे यांनी म्हटले आहे.

बावनकुळे म्हणतात; अजित पवारांना मुख्यमंत्री होण्यासाठी शुभेच्छा!

विखेंचे टेन्शन वाढणार

मध्यंतरी शिवाजी कर्डिले हे जिल्हा बँकेचे अध्यक्ष झाले. त्यावेळी आता माझी लोकसभेची जबाबदारी कर्डिले यांच्यावर आली असल्याचे सुजय विखे यांनी जाहीर केले होते. खासदार सुजय विखे यांना पक्षातून लोकसभेसाठी विरोधक नाही, असे बोलले जात होते. परंतु आता राम शिंदे यांनीही लोकसभेच्या तिकीटासाठी दावा सुरू केला आहे. त्यामुळे विखे पिता-पुत्रांचे टेन्शन वाढणार आहे.

Tags

follow us