Download App

भाऊसाहेब वाकचौरेंच्या हाती पुन्हा शिवबंधन; ठाकरेंचा शिर्डीचा उमेदवार ठरला!

Ahmednagar Politics : शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यानंतर पक्षवाढीसाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. जुन्या सहकाऱ्यांना पुन्हा पक्षात आणले जात आहे. आता ठाकरे गटाने शिर्डी (Shirdi) लोकसभेसाठी उमेदवार शोधला आहे. त्यानुसार आज माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे (Bhausaheb Wakchaure) यांनी आज मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन हाती बांधले. ठाकरे गटात वाकचौरेंच्या प्रवेशाने नगर जिल्ह्यात ठाकरे गटाची ताकद निश्चितच वाढणार आहे.

माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरेंवर ठाकरेंचा पुन्हा डाव, शिर्डीच्या मैदानात उतरविणार!

प्रशासकीय अधिकारी राहिलेले भाऊसाहेब वाकचौरे हे २००९ ला शिर्डीतून शिवसेनेच्या तिकीटावर खासदार झाले होते. त्यांनी आघाडीकडून उमेदवार असलेले रामदास आठवले यांचा पराभव केला होता. परंतु 2014 मध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांना काँग्रेसमध्ये आणत लोकसभेची उमेदवारी दिली होती. ऐनवेळी शिवसेनेने सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी दिली. लोखंडेंनी वाकचौरे यांचा पराभव केला होता. त्यानंतर वाकचौरे हे भाजपमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर ते श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावरही पराभूत झाले होते. त्यानंतर काही दिवस ते भाजपसाठी काम करत होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून ते राजकारणात सक्रीय नव्हते.

चार दिवसांपूर्वी ते मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले होते. त्यानंतर भाऊसाहेब वाकचौरे यांनी स्वतःच ठाकरे गटात प्रवेश करत असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आज पुन्हा ते मुंबईकडे रवाना झाले. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला.

काँग्रेसनं वर्किंग कमिटीत का डावललं? आनंदात असणाऱ्या मित्रांना थोरातांचं थेट उत्तर

माझी चूक मला मान्य, आता मी पुन्हा घरी आलो – वाकचौरे

यावेळी वाकचौरे यांनी आपली चूक मान्य केली. यापुढे शिवसेनेला दिल्लीपर्यंत पोहोचविणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. शिवसेना फक्त महाराष्ट्रत नाही तर दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचवायची आहे. सुबह का भुला श्याम को घर वापस लौटता हे ते उसे भुला नहीं कहते. तसा मी आहे. मी घरवापसी केली आहे. मी काहीही चुका केल्या असल्या तरी मी आता पुन्हा घरी परत आलो आहे.

शिवसैनिक मनाचा दिलदार, माफीही देतो – उद्धव ठाकरे

काही दिवसांपू्र्वी वाकचौरे स्वतः मला भेटले. त्यांनी मला मी चूक केली असं सांगितलं. मी त्यांना शिवसैनिकांची माफी मागा असं म्हणालो. आपण राजकारणात पक्षांतर पाहिलं पण, सध्या पक्ष संपवण्याचं कारस्थान पहिल्यांदाच पाहतोय. तुम्ही सगळे शिवसैनिक दिलदार आहात. जर एखादा चुकला आणि पश्चाताप केला तर शिवसैनिक त्याला माफ करतो. शिवसैनिक चुकीला माफी देतो असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

Tags

follow us