‘विखे पाटलांनी फडणवीसांच्या गळ्यात मंगळसूत्र बांधावं’ ; राऊतांचा खोचक टोला

Sanjay Raut News : राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेच आमच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी खोचक शब्दांत टीका केली. राऊत यांनी आज जळगावात उद्धव ठाकरे यांच्या सभेआधी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना विखे पाटील […]

Radhakrishna Vikhe and Sanjay Raut

Vikhe And Raut

Sanjay Raut News : राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेच आमच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी खोचक शब्दांत टीका केली. राऊत यांनी आज जळगावात उद्धव ठाकरे यांच्या सभेआधी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना विखे पाटील यांच्या वक्तव्याबाबत विचारले. त्यावेळी राऊत यांनी मंत्री विखे यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

ते म्हणाले, तुमच्या मनात कोणी असेल आणि तुम्ही दुसऱ्याचबरोबर नांदत असाल तर हा व्यभिचार आहे. लग्न एकाबरोबर आणि संसार दुसऱ्याबरोबर हा व्यभिचार आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मनातील मुख्यमंत्री फडणवीस असतील तर त्यांनी आता फडणवीसांच्या गळ्यात मंगळसूत्र बांधावं, असा खोचक टोला राऊत यांनी लगावला.

करुणा मुंडे करणार मोठा राजकीय गौप्यस्फोट; दाखवणार ‘तो’ व्हिडीओ

शिंदे-फडणवीस सरकारचे डेथ वॉरंट निघाले

राज्य सरकारच्या भवितव्यावरही राऊत यांनी आधी भाष्य केले होते. ते म्हणाले होते, की सध्या जो तो आपापल्या पद्धतीने गणित मांडत आहे. आम्ही मात्र निर्णयाची वाट पाहत आहोत. पण, येत्या 15 ते 20 दिवसात हे सरकार कोसळल्याशिवाय राहणार नाही. याआधीही मी एकदा म्हणालो होतो की हे सरकार फेब्रुवारीपर्यंत कोसळेल. पण, न्यायालयाचा निकाल उशीरा लागत आहे. पण हे सरकार टिकणार नाही. सरकारचे डेथ वॉरंट निघाले आहे. आता सही कोणी आणि कधी करायचे हे देखील ठरल्याचे राऊत म्हणाले होते.

सभेआधी राजकारण जोरात

उद्धव ठाकरे यांची आज जिल्ह्यातील पाचोरा येथे सभा होणार आहे. सभेआधीच राजकारणाचा पारा चढला आहे. मंत्री गुलाबराव पाटील आणि संजय राऊत यांच्यात जोरात शाब्दिक युद्ध सुरू आहे. शिंदे गटाने सभा उधळून लावण्याचा इशारा दिला आहे तर संजय राऊत यांनी सरकार लवकरच कोसळणार असल्याचा इशारा दिला आहे. सभेत काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

भावा-बहिणीच पुन्हा बिनसलं…पंकजा मुंडेंनी साधला धनंजय मुंडेंवर निशाणा

Exit mobile version