Download App

जाहिरातबाजी अजितदादांच्या रडारवर! जाहिरात पाहून संतापले थेट अधिकाऱ्यांना दिले ‘हे’ आदेश

Ajit Pawar : अजित पवार यांनी अर्थखात्याचा कारभार हाती घेतल्यानंतर सरकारी तिजोरीतून जाहिरातींवर होणाऱ्या उधळपट्टीला चाप लावण्याचा इशारा दिला आहे. मी शो करणारा, जाहिरातबाजी करणारा मी तर आजच पेपरला बघितलं की बाहेरच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची जाहिरात आपल्याकडे पानभर पण आपल्या जाहीराती बाहेरच्या राज्यात नाही ना?, आपली जाहिरात आपल्याच राज्यात आपल्याच राज्यात पाहिजे म्हणून याची माहिती घेण्यास अधिकाऱ्यांना सांगितले आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिकमध्ये आहेत. येथे आयोजि करण्यात आलेल्या रॅलीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली. मोदी सरकारच्या वंदे भारत ट्रेनचे कौतुकही केले.

https://letsupp.com/maharashtra/thinking-about-the-party-symbol-and-name-and-ajit-dada-again-hit-the-eye-67990.html

ते म्हणाले, मी याआधी वंदे भारतने प्रवास केला नव्हता. मला सोलापुरलाही जायचं होतं. म्हणून त्या ट्रेनने जाण्याचा निर्णय घेतला. लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना सगळीकडचा अनुभव घेतला. लोकांनी सांगणं हे तर महत्वाच आहेच पण आपण स्वतः त्याचा अनुभव घेतला तर निर्णय घेतला तर अधिक सोपं जातं. म्हणून मी या ट्रेनने प्रवास केला असे त्यांनी सांगितले.

शिंदेंची जाहिरात होती टार्गेट 

दरम्यान, अजित पवार ज्यावेळी विरोधी पक्षनेते होते तेव्हा राज्य सरकारच्या जाहिरातबाजी आणि चहापानावर सडकून टीका करायचे. राज्य सरकारकडून जाहिरातींवर कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी केली जाते. चहापानाचा खर्चही अवाढव्य आहे. उलट हे पैसे शेतकरी, सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी सरकारने वापरावेत असे अजित पवार नेहमीच म्हणायचे. त्यानंतर सरकारने मध्यंतरी ‘राष्ट्रात मोदी महाराष्ट्रात शिंदे’  अशा टॅगलाइनने वृत्तपत्रात जाहिराती दिल्या होत्या. त्यावरून मोठे रान उठले होते. तेव्हाही अजित पवार यांच्यासह विरोधी पक्षांनी सरकारला प्रचंड टार्गेट केले होते.

माझ्या दालनात पवार साहेबांचा फोटो

पवार साहेब आमचे श्रद्धास्थान, प्रेरणास्थान आहेत. त्याबद्दल आपण काही काळजी करू नका. माझ्या स्वतःच्या चेंबरमध्ये पवार साहेबांचा फोटो आहे असे म्हणत त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले.

 

Tags

follow us