Ahmednagar : मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)यांच्या अंतरवाली सराटी ते मुंबई (Mumbai)पद यात्रा अहमदनगरमार्गे Ahmednagar जाणार आहे. यामध्ये लाखोंच्या संख्येने मराठा बांधव सहभागी असणार आहेत. या मराठा समाज बांधवांच्या मुक्कामासाठी बाराबाभळी येथील मदरसा येथील मोकळ्या जागेची पाहणी करण्यात आली आहे.
खोटे बोलून शिवसैनिकांचा विश्वासघात केलेल्यांना जागा दाखवणार, CM शिदेंची ठाकरेंवर घणाघाती टीका
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)यांच्या नेतृत्वाखाली अंतरवाली सराटी येथून 20 जानेवारीला पदयात्रेने मुंबईला जाण्यासाठी सुरुवात होणार आहे. या पदयात्रेत लाखोच्या संख्येने मराठा बांधव सहभागी होणार आहेत.
‘मराठी रंगभूमीचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध’; CM शिंदेची ग्वाही
ही पदयात्रा अंतरवाली सराटीपासून गेवराई, खरवंडी, पाथर्डी, तिसगाव, अहमदनगर, केडगाव, सुपा, शिरूर, वाघोली, शिवाजीनगर, पुणे, मुंबई एक्सप्रेस हायवे, लोणावळा, पनवेलहून मुंबई अशा मार्गाने जाणार आहे.
नगरमधून जाणाऱ्या या पदयात्रेसाठी बाराबाभळीमधील मदरसा शेजारील 85 एकर जागेची व मदरसाची पाहणी करण्यात आली. मदरसाची पाहणी जरांगे पाटील याच्या नियोजन कमिटीने केली आहे. यावेळी मदरसाचे सेक्रेटरी मतीन सय्यद समवेत श्रीराम कुरणकर, राम जरांगे, गोरख दळवी, मिलिंद जपे, भाग्येश सवासे, विलास तळेकर, स्वप्निल दगडे, सुधीर दुसंगे, संदीप जगताप, परमेश्वर पाटील आदी उपस्थित होते.
जरांगे पाटील यांच्या नियोजन कमिटीने पाहणी केली असून मराठा मोर्चा नगर शहरात येत असताना बाराबाभळी येथील मदरसामध्ये मुक्काम असणार आहे. या ठिकाणी अन्न, पाणी, लाईट, निवास या सोयी-सुविधांची नियोजन कमिटीने पाहणी केली व येथेच मुक्कामी थांबण्याचे आश्वासन दिले आहे.