Market Committee Election Rahuri : सध्या राज्यभरात बाजार समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. प्रत्येक पक्ष आपआपल्या पद्धतीने निवणुकीची तयारी करत आहे. काही ठिकाणी विरोधात असलेले पक्ष एकत्र येऊन पॅनल बनवत आहेत. तर काहीजण दुसऱ्या पक्षातील उमेदवार आपल्या पक्षात आणत आहेत. नगर जिल्ह्यातील राहुरी बाजार समितीची निवडणूक 28 एप्रिलला पार पडणार असून अर्ज माघार घेण्याच्या अखेरच्या दिवशी चित्र स्पष्ट झाले.
भारतीय जनता पक्ष प्रणित विकास मंडळ व महाविकास आघाडी प्रणित जनसेवा मंडळाच्या अनेक इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले. एकूण 18 जागांसाठी भाजप व महाविकास आघाडीमध्ये सरळ लढत होणार आहे. 18 जागांसाठी 39 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
विविध सेवा सोसायटी सर्वसाधारण गट : सात जागा
महाविकास आघाडी-जनसेवा मंडळ- अरुण तनपुरे ,महेश पानसरे, बाळासाहेब खुळे, दत्तात्रय कवाने, नारायण सोनवणे ,विश्वास पवार, रखमाजी जाधव.
भाजप प्रणित विकास मंडळ- उदयसिंह पाटील ,सत्यजित कदम, शामराव निमसे, संदीप आढाव ,महेंद्र तांबे ,भगीरथ पवार ,किरण कोळसे, विविध
सोसायटी महिला राखीव : दोन जागा
महाविकास आघाडी – शोभा डुकरे, सुनीता खेवरे.
भाजप प्रणित विकास मंडळ आघाडी – उज्वला साबळे, उषा मांगुर्डे.
विविध सेवा सोसायटी इतर मागास प्रवर्ग जागा एक :
महाविकास आघाडी – दत्तात्रय शेळके
भाजप प्रणित विकास मंडळ – दत्तात्रय खुळे
तर विविध सेवा सोसायटी विमुक्त जाती भटक्या जमाती गटात रामदास बाचकर जनसेवा मंडळ व आशिष बिडगर विकास मंडळ अशी लढत होणार आहे.
ग्रामपंचायत मतदार संघ सर्वसाधारण : दोन जागा
मंगेश गाडे व शारदा आढाव जनसेवा मंडळ यांच्या विरोधात अमोल भनगडे व विराज धसाळ हे निवडणूक रिंगणात आहेत.
ग्रामपंचायत मतदार संघ अनुसूचित जाती जमाती मधुकर पवार जनसेवा मंडळ व नंदकुमार डोळस भाजपा आघाडी अशी लढत होईल.ग्रामपंचायत मतदार संघ आर्थिक
दुर्बल घटक : एक जागा
गोरक्षनाथ पवार जनसेवा मंडळ यांच्या विरोधात सुरेश बानकर अशी लढत आहे .
व्यापारी आडत मतदारसंघ : दोन जागी
चंद्रकांत पानसंबळ व सुरेश बाफना यांच्या विरोधात राजेंद्र वालझाडे व दीपक मेहत्रे अशी लढत आहे. हमाल मापाडी मतदारसंघ मारुती हारदे जनसेवा मंडळ यांच्या विरोधात शहाजी तमनर भाजपा विकास मंडळ अशी लढत होणार आहे.
राम शिंदेंचा रोहित पवारांना मोठा धक्का
कृषी पतसंस्था मतदारसंघात सर्वसाधारण चौदा जागांसाठी आता 16 उमेदवार रिंगणात आहेत. एकूण 18 जागांसाठी 39 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. छाननीनंतर 215 पैकी 176 उमेदवारांनी त्यांच्या अर्ज मागे घेतले त्यामुळे आता निवडणूक रिंगणात 39 उमेदवार उभे आहेत.