Download App

आमदार लंकेंनी आता मनावर घेतलयं.. थेट विखेंच्या मतदारसंघातच घुसले…

MLA Nilesh Lanke : राज्यात सध्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. यातच सध्या बाजार समितीच्या निवडणुकींसाठी नेतेमंडळींकडून धावपळ सुरु आहे. नुकतेच राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी मंत्री राधाकृष्ण विखेंच्या मतदार संघात जात प्रचार केला आहे. तसेच यावेळी त्यांनी काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची स्तुती देखील केली. महाराष्ट्रातील सुसंस्कृत मंत्री म्हणून नगर जिल्ह्याला थोरातांचा सार्थ अभिमान आहे. राहता तालुक्यात परिवर्तन नक्की होणार आहे. येथे सर्वसामान्य जनता हुकूमशाहीला कंटाळली असून परिवर्तनाची सुरुवात दक्षिणेसह राहत्यातूनच होणार आहे, असे म्हणत प्रचार करत एकप्रकारे लंके यांनी विखेंवर निशाणा साधला आहे.

कोल्हार येथील माधवराव खर्डे पाटील चौकात महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित शेतकरी व मतदार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पारनेरचे आमदार निलेश लंके बोलत होते. यावेळी बोलताना लंके म्हणाले, महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर काही मंडळी अस्वस्थ होती अत्यंत हुकूमशाही पद्धतीने दबाव टाकून त्यांनी सरकार पाडले आहे. हुकूमशाहीचा अंत अत्यंत वाईट होत शेतकरी कामगार व व्यापारी यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी बाजार समितीच्या निवडणुकीत कुणालाही न घाबरता परिवर्तनाला साथ द्या असे आवाहनही त्यांनी केले.

याप्रसंगी आमदार निलेश लंके, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बबनराव घोलप, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, रावसाहेब म्हस्के, सुधीर म्हस्के ,ॲड. पंकज लोंढे, डॉ एकनाथ गोंदकर, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद लबडे, सचिन कोते, काँग्रेस नेते सुरेश थोरात यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, पूर्वीच्या काळी अत्यंत वैभवशील असलेला राहता तालुका विकासात मागे पडला आहे. खड्ड्यांसाठी राज्यात कुप्रसिद्ध असलेला नगर- मनमाड रस्ता इतकी वर्ष का होत नाही हे मोठे कोडे आहे. दहशत रोखण्यासाठी महाविकास आघाडीचा पॅनल उभा असून राहता बाजार समितीत परिवर्तन निश्चित होणार असे थोरात म्हणाले. आम्ही लोकशाही मानणारे असून राजकारणात सर्वांना बरोबर घेऊन जात विकासाचे राजकारण करणे ही आपली पद्धत आहे. मात्र राहता तालुक्यात विकासाऐवजी दहशतीचे राजकारण आहे.

इकडे चांगले काम करायचे नाही आणि संगमनेरला जे चांगले काम सुरू आहे. त्यामध्ये अडचणी निर्माण करायचे असे काम काही लोक करत आहे. मात्र आता दहशतीमधून बाहेर पडत येथील उमेदवारांनी धाडस करत निवडणूक लढवली आहे. आज शेकडो लोक जमा झाले आहेत उद्या लाखो मतदान करतील असा विश्वास व्यक्त करताना यावर्षी, गोदावरी, दारणा नदीला चांगले पाणी असूनही पुणतांब्यात पानी का पोहोचले नाही असा सवाल करताना आपण निळवंडे धरणाचे पाणी ऑक्टोबर 2022 मध्येच दुष्काळी भागाला देणार होतो. मात्र आता हे काम का थांबले, काय अडचणी झाल्या हेही कळायला मार्ग नाही असेही त्यांनी म्हटले आहे.

Tags

follow us