अहमदनगर : श्रीगोंदा (Shrigonda)व नगर (Nagar)तालुक्यातील 35 गावांना वरदान ठरणाऱ्या साकळाई उपसा सिंचन योजनेला (Saklai Upsa Irrigation Scheme)मान्यता दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis)यांच्याप्रती कृतज्ञता सोहळ्याचं आयोजन नगर तालुक्यातील रुई छत्तिशी (Rui Chattisi)येथे करण्यात आलं आहे. त्यावेळी नगर दक्षिणचे खासदार सुजय विखे (Sujay vikhe patil)यांनी कार्यक्रमात साकळाई योजनेच्या सर्वेक्षणाला मान्यता मिळण्यापासून तर थेट सिंचन योजनेला मान्यता मिळण्यापर्यंतची सर्व कागदपत्रं यावेळी सर्वांसमोर दाखवली. यावेळी खासदार विखे पाटलांनी राष्ट्रवादी कॉंग्रेससह तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर (Mahvikas Aghadi Sarkar)जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारमधील जलसंपदा मंत्री जयंत पाटलांनी (Jayant patil)कशा पद्धतीनं साकळाई योजनेला डावललं याबद्दलही यावेळी सांगितलं. त्याचबरोबर यावेळी विखे पाटलांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्यावरही जोरदार टीका केली.
खासदार विखे पाटील म्हणाले की, आजचा हा दिवस नगर आणि श्रींगोंदा तालुक्यातील जिरायत भागातील शेतकऱ्यांसाठी विजय दिवस आहे. आजचा हा दिवस त्या सर्व शेतकऱ्यांना समर्पित करतो ज्यांनी गेल्या तीस वर्षांपासून आंदोलनांच्या माध्यमातून, उपोषणाच्या माध्यमातून, रास्ता रोकोच्या माध्यमातून अशा विविध आंदोलनं श्रीगोंदा आणि नगर तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली. जे-जे नेते या आंदोलनांमध्ये सहभागी असतील, त्या-त्या सर्वांचा आज विजय दिवस आहे. आता जेव्हा एखादी योजना, प्रकल्प मार्गी लागतो त्यावर राजकारण देखील होतं.
कुणाल भंडारी हल्ला प्रकरण विधानसभेत गाजलं! नितेश राणेंचा आक्रमक पवित्रा
साकळाईच्या बद्दलची वस्तूस्थिती मी कागदांच्या माध्यमातून दाखवणार आहे. या योजनेसाठी 30 वर्ष का थांबावं लागलं? आपलं भविष्य काय आहे? हे आज सांगणार आहे. लोकसभेच्या दरम्यान राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा वाळकीला आले होते, त्यावेळी त्यांनी शब्द दिला होता की, या ठिकाणी भाजपचा खासदार निवडून दिल्यानंतर साकळाई योजनेला आम्ही मान्यता देऊ.
त्यानंतर खासदार सुजय विखे पाटलांनी, लाव रे बाबा ते असं म्हणत 2019 मध्ये साकळाई योजनेच्या सर्वेक्षणाला मान्यता दिल्याचं पत्रच सर्वांना दाखवलं. भाजप-शिवसेनेचं सरकार असताना 30 वर्षांच्या संघर्षानंतर दिलेला शब्द हा देवेंद्र फडणवीसांनी लोकसभेनंतरच पूर्ण केला.
यानंतर मात्र राज्यात गद्दारीनी निवडणुकीपूर्वी झालेल्या युतीला तोडत स्वतःचा स्वार्थ साधत, मला मुख्यमंत्री व्हायचंय माझ्या मुलाला कॅबिनेट मंत्री करायचंय, आपल्या तत्त्वाशी तडजोड करुन निवडणुकीनंतर गद्दारी करुन महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं.
त्यानंतर आपले श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुतेंनी विधानभवनात तारांकीत प्रश्न उपस्थित केला. त्यामध्ये विचारलं की, साकळाई प्रकल्पाचा समावेश तुमच्या कुकडी प्रकल्पामध्ये करण्यात आला आहे की नाही? त्याच्या उत्तरामध्ये तुम्ही पाहू शकता की, की त्या उत्तरामध्ये पाहू शकता की, कुकडी प्रकल्पामध्ये साकळाईचा समोवेश नाही असं उत्तर शासनाकडून देण्यात आलं.
त्यावेळच्या महाविकास आघाडी सरकारनं या योजनेला पूर्णपणे नकार दिल्याचं यावेळी खासदार विखे पाटील यांनी सांगितलं. आपण पुढं गेलो तर 19 जानेवारी 2022 तत्कालीन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी वाळकीमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचारादरम्यान शब्द दिला होता की, आम्ही साकळाई करु.
त्यांच्या मिटींगचा उल्लेख केला की, 19 जानेवारी 2022 ला जयंत पाटलांच्या मिटींगमध्ये कुकडी जलसिंचन योजनेद्वारे पाणी सोडण्यासाठी योजनांना मंजूरी मिळणेबाबत आणि त्यावर उत्तर असं मिळालं की, प्रकल्पातील पाण्याचं पूर्णपणे नियोजन झालं असून सध्या स्थितीत कुकडी प्रकल्पामध्ये पाणी उपलब्ध नाही.
असं जयंत पाटलांनी मिटींगमध्ये स्पष्ट उल्लेख केला की, आता कुकडीमध्ये पाणी शिल्लक नाही, त्यामुळं साकळाई योजनेला पाणी उपलब्ध नाही, तोपर्यंत साकळाई योजनेला मान्यता देण्यात येणार नाही. असं सांगितलं पण तेच मंत्री ज्यावेळी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेले होते, त्यावेळी त्यांना कुकडीमध्ये अचानक 5 टीएमसी पाणी सापडलं. हे पाणी अहमदनगर जिल्ह्यासाठी नाहीतर ते पुणे जिल्ह्यातील काही गावांसाठी असल्याचंही यावेळी खासदार सुजय विखे पाटलांनी सांगितलं.