Download App

“आमचा स्ट्राईक रेट शिवसेनेपेक्षा चांगला, बरोबरीने खाती द्या”, भुजबळांनी शिंदेंना डिवचलं

स्टाइकरेट नुसार आम्ही दोन नंबरवर आहोत. महायुतीत भाजप एक नंबर तर आम्ही दोन नंबरवर आहोत असे भुजबळ म्हणाले आहेत.

Chhagan Bhujbal on Eknath Shinde Shivsena : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं मोठं यश मिळवलं. एकनाथ शिंदे शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही सरस कामगिरी केली. शिंदे गटाचे 57 तर अजित पवार गटाने 41 आमदार निवडून आले आहेत. या दोन्ही पक्षांचा स्ट्राईक रेट जवळपास सारखाच असला तरी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न चालवला आहे. यातच आता आमदार छगन भुजबळ यांनी शिंदे गटाला डिवचणारे वक्तव्य केलं आहे. स्टाइकरेट नुसार आम्ही दोन नंबरवर आहोत. महायुतीत भाजप एक नंबर तर आम्ही दोन नंबरवर आहोत असे भुजबळ म्हणाले आहेत.

Eknath Shinde : पराभव ही सामुहिक जबाबदारी, एका निवडणुकीने सर्वकाही संपत नाही 

छगन भुजबळ पुढे म्हणाले, मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येते. पण यावेळी जरा जास्त अडचण आहे. दरवेळी 160 असतात पण यावेळी जास्त आमदार आहेत. त्यामुळे यंदा सर्व पक्षांतून नवीन जुने असे चेहरे येतील.

अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षाच्या आमदारांची बैठक झाली. या बैठकीत आमची चर्चा झाली की एकनाथ शिंदे यांचे जास्त आमदार निवडून आले तर आपले कमी आमदार निवडून आले आहेत. मात्र स्ट्राईक रेटच्या बाबतीत भाजपनंतर आपला पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आहे तर शिंदे साहेबांचा गट तीन नंबरवर गेला आहे. तेव्हा त्यांच्या बरोबरीने आम्हालाही मंत्रीपदं मिळावीत अशी मागणी करण्यात आल्याचे भुजबळ म्हणाले.

जितेंद्र आव्हाडांवर बोलताना भुजबळ म्हणाले की, ते त्यांच्या पक्षाचे गटनेते आहेत म्हणून बोलत आहेत. सरकार स्थापनेला याआधी देखील 1 महिना उशिरा झालेला आहे. जेव्हापासून महाराष्ट्र राज्य निर्माण (Maharashtra Politics) झालंय, तेव्हापासून ही पध्दत आहे. 132 आमदार आहेत, त्यांना पण लोक निवडायचे आहेत. पंतप्रधान आणि अमित शहा एका कॉन्फरन्समध्ये होते, म्हणून वेळ गेला. कुणालाही अस्वस्थ होण्याची गरज नाही. राज्यात सगळेजण आपापलं काम करत असल्याचं छगन भुजबळ म्हणाले आहेत.

भाजपच्या 132 जागा, त्यामुळे मुख्यमंत्री भाजपचाच; छगन भुजबळांनी क्लिअर सांगितलं 

मंत्रि‍पदांबाबत काही कल्पना नसल्याचं छगन भुजबळांनी स्पष्ट केलंय. ते म्हणाले की, अजित पवार यांच्यासोबत आमची बैठक झाली, तेव्हा स्ट्राईक रेटबाबत विषय झाला. एक नंबर भाजप आहे, तर दोन नंबरला आम्ही आहोत. नवीन चेहऱ्यांना संधी नेहमी देण्यात येते. यावेळी जरा अडचण जास्त आहेत. दर वेळी 160 असतात यावेळी जास्त आमदार आहेत. सर्व पक्षांमध्ये नवीन जुने चेहरे येतील, असं देखील भुजबळ म्हणाले आहेत. माजी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचा मानसन्मान राखला जाईल, असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय.

follow us