गोमांस तस्करीचा संशय; नाशिकमध्ये जमावाकडून तरुणाची हत्या

Nashik Crime News : नाशिकमध्ये गोमांस तस्करीच्या संशयावरुन एका मुस्लिम तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शनिवारी रात्री गोमांसाच्या तस्करीच्या संशयावरुन काही जणांच्या जमावाने एका तरुणाला जबर मारहाण करण्यात आली. त्यात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. अफान अन्सारी (रा. कुर्ला पूर्व)असं मृत तरुणाचं नाव आहे. तर त्याचा दुसरा सहकारी मारहाणीमध्ये गंभीर जखमी […]

Crime

Crime

Nashik Crime News : नाशिकमध्ये गोमांस तस्करीच्या संशयावरुन एका मुस्लिम तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शनिवारी रात्री गोमांसाच्या तस्करीच्या संशयावरुन काही जणांच्या जमावाने एका तरुणाला जबर मारहाण करण्यात आली. त्यात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. अफान अन्सारी (रा. कुर्ला पूर्व)असं मृत तरुणाचं नाव आहे. तर त्याचा दुसरा सहकारी मारहाणीमध्ये गंभीर जखमी झाला आहे. नासीर कुरेशी असं जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे. (nashik-youth-killed-by-mob-on-suspicion-of-beef-smuggling)

सुरुची अडारकर दिसणार नव्या भूमिकेत; ‘छोट्या बायोची मोठी स्वप्न’मधून प्रेक्षकांच्या भेटीला

सविस्तर माहिती अशी की, इगतपुरी तालुक्यातील घोटी-सिन्नर मार्गावरील गंभीरवाडीजवळ शनिवारी सायंकाळी गोमांस घेऊन जात असल्याच्या संशयावरुन कार अडवण्यात आली. कारमधील दोघा तरुणांना दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने गज आणि दांडक्याने जबर मारहाण केली. त्यात अफान अन्सारी याचा मृत्यू झाला तर नासीर कुरेशी हा गंभीर जखमी झाला आहे.

‘सूरज चव्हाणचा मनसुख हिरेन होणार’; नितेश राणेंच्या दाव्याने खळबळ

घटनास्थळी पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अप्पर अधीक्षक माधुरी कांगणे, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथक थेट घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी रात्रीत सूत्रे फिरवून 10 संशयितांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी देखील इगतपुरी तालुक्यात अशाच प्रकारची घटना घडली होती. कसारा घाट परिसरात जमावाकडून गोमांस वाहतूक तस्करीच्या संशयातून गाडी अडवली होती. त्यावेळी दोन गटांमध्ये झालेल्या बाचाबाचीत दोन जणांना जमावाने बेदम मारहाण केली होती. त्याचवेळी अंधाराचा फायदा घेऊन त्यातील एकाने पळ काढला. अंधारामध्ये पळताना तो अडीचशे फुट खोल दरीत पडून त्याचा मृत्यू झाला होता.

Exit mobile version