मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघात MIDC होण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आक्रमक झाले आहेत. आज (24 जुलै) विधिमंडळाच्या बाहेर रोहित पवार यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. विधिमंडळाच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर पायऱ्यांवर ते उपोषणाला बसले आहेत. तसंच “पाऊस असो वा इतर कोणताही अडथळा… जोपर्यंत माझ्या मतदारसंघातील युवांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हलणार नाही” असा निर्धार त्यांनी केला आहे. (NCP mla Rohit Pawar aggressive about Karjat Jamkhed midc issue)
माझ्या मतदारसंघातील #MIDC चा प्रश्न आश्वासन देऊनही सरकार मार्गी लावत नाही. दबावाच्या राजकारणाला बळी पडणाऱ्या सरकारचा धिक्कार!
आता अखेरचा पर्याय!#उपोषण
रयतेचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी आणि देशाच्या संविधानाच्या उद्देशिकेजवळ,
विधिमंडळ आवार, मुंबई. pic.twitter.com/bIsrdVLNCi— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 24, 2023
माझ्या मतदारसंघातील MIDC चा प्रश्न आश्वासन देऊनही सरकार मार्गी लावत नाही. दबावाच्या राजकारणाला बळी पडणाऱ्या सरकारचा धिक्कार! आता अखेरचा पर्याय! उपोषण रयतेचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी आणि देशाच्या संविधानाच्या उद्देशिकेजवळ, विधिमंडळ आवार, मुंबई. पाऊस असो वा इतर कोणताही अडथळा… जोपर्यंत माझ्या मतदारसंघातील युवांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हलणार नाही!
पाऊस असो वा इतर कोणताही अडथळा… जोपर्यंत माझ्या मतदारसंघातील युवांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हलणार नाही!#MIDC_आंदोलन pic.twitter.com/Cdwg1MHscW
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 24, 2023
कर्जत-जामखेड मतदारसंघात मागील सरकारने एमआयडीसीला मान्यता दिली आहे. कर्जत तालुक्याील खंडाळा आणि पाटेगावमध्ये एमआयडीसीला मंजूर करण्यात आली आहे. परंतु त्याची अधिसूचना अद्याप निघालेली नाही. त्यासाठी आमदार रोहित पवार मागील अनेक दिवसांपासून प्रयत्न करत आहेत. यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेत निवेदन दिले आहे. तसंच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या दिवशी म्हणजे 31 मे 2023 रोजी एमआयडीसीची अधिसूचना काढावी आणि तर इतर कायदेशीर बाबी राजर्षी शाहू महाराज जयंतीपर्यंत (२६ जून २०२३) पूर्ण करावी. अन्यथा थेट उपोषण करण्याचा इशारा रोहित पवारांनी दिला होता.
वारंवार स्मरणपत्र देऊनही राजकीय द्वेषामुळे माझ्या मतदारसंघातील #MIDC ची अधिसूचना सरकार काढत नाही. त्यामुळं स्मरणशक्ती वाढावी म्हणून सरकारला च्यवनप्राश देण्याची आणि प्रसंगी माझ्या मतदारसंघातील युवा आणि नागरिकांसाठी उपोषण करण्याचीही माझी तयारी आहे.@mieknathshinde@samant_uday pic.twitter.com/lz8FTIVbGx
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 17, 2023
वारंवार स्मरणपत्र देऊनही राजकीय द्वेषामुळे माझ्या मतदारसंघातील एमआयडीसीची अधिसूचना सरकार काढत नाही, असा आरोपही रोहित पवारांनी यापूर्वीच केला आहे. यासाठी स्मरणशक्ती वाढावी म्हणून सरकारला च्यवनप्राश देण्याची आणि प्रसंगी माझ्या मतदारसंघातील युवा आणि नागरिकांसाठी उपोषण करण्याचीही माझी तयारी असल्याचेही रोहित पवारांनी म्हटले होते. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी एमआयडीसीत उद्योग येण्यासाठी रोहित पवार यांनी टीपीसीएल, जिंदाल, एशियन पेंटस् कंपन्यांच्या मालकांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चाही केली आहे.