Download App

MIDC : ‘म्हणून’ राम शिंदे त्यांच्या नेत्यांचे पाय धरत आहेत… : रोहित पवारांचे प्रत्युत्तर

मुंबई : एमआयडीसी बाबतीत उदय सामंत यांच्याबाबतीत मला काय बोलायचं नाही, ते माझे मित्र आहेत. पण त्यांची अडचण झाली आणि ती मी बघत आहे. अडचण एवढीच आहे की रोहित पवार यांना क्रेडिट जाऊ नये. यासाठी माझे विरोधक त्यांच्या नेत्यांचे पाय धरत आहेत, असं म्हणत राष्ट्रवादी (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी भाजप आमदार राम शिंदे यांच्या आजच्या भाषणाला प्रत्युत्तर दिलं. ते विधिमंडळ आवारात माध्यमांशी बोलत होते. (NCP MLA Rohit Pawar alligation BJP MLC Ram Shinde on Karjat MIDC)

काय म्हणाले रोहित पवार?

मी खूप काही डिटेलमध्ये ऐकलेलं नाही. कारण राम शिंदे यांचा अभ्यास इतका कच्चा असतो की त्यांचं भाषण ऐकू वाटत नाही. मोघम गोष्टी त्यात जास्त असतात. ते 10 वर्ष कर्जत जामखेडचे लोकप्रतिनिधी राहिले आहेत. 5 वर्ष कॅबिनेट मंत्री राहिले आहेत. पण ते बोलताना असं म्हणाले की, जामखेडला 30 वर्षांपूर्वी एमआयडीसी स्थापन झाली, आणि त्यात आजपर्यंत कधीही उद्योग आले नाहीत, असं काही तरी ते बोलले. पण त्यांना मला सांगायचं आहे की, जामखेडमध्ये एमआयडीसीची वसाहत नाही, तिथं जामखेड अद्यौगिक सहकारी संस्था आहे. भाजपच्या काळातच त्यांना जी जमीन हस्तांतरित होणं गरजेचं होतं ती झाली नाही. पाण्याचा प्रश्न आहे.

कर्जत एमआयडीसीच्या प्रस्तावित जागेत नीरव मोदीची जमीन; राम शिंदेंच्या दाव्याने मोठी खळबळ

एखादा मोठा प्रकल्प आणायचा असेल तर 100 ते 150 एकर जमीन पाहिजे, 50 एकरमध्ये काय करणार आहे? राम शिंदे म्हणाले कर्जत जामखेडचे युवक काय बेरोजगार राहिले का? पण त्यांना मला सांगायचं आहे की कर्जत जामखेडमधील 30 ते 35 हजार लोकं पिंपरी चिंचवड, मुंबई, बारामती, अहमदनगरच्या एमआयडीसीमध्ये कामाला जातात. नवीन युवक आहेत तो वेगळा. पण कसं आहे, ज्या व्यक्तीने कुठेही फॉलोअप न घेता, कुठेही प्रयत्न न करता स्वतःची बाजू कशी तरी मांडून राजकारण कसं करता येईल, याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला. आम्ही तिथं 1100 ते 1200 एकराची एमआयडीसी यावी यासाठी प्रयत्न करत आहोत. हाय पावर्ड कमिटीने परवानगी दिली आहे. सह्या झाल्या आहेत. अधिसूचना काढणं बाकी आहे आणि यासाठी उद्योग मंत्र्यांची सही हवी आहे. वर्षभरापासून हा प्रस्ताव तिथं धूळखात पडून आहे.

उदय सामंत यांच्याबाबतीत मला काय बोलायचं नाही, ते माझे मित्र आहेत. पण त्यांची अडचण झाली आणि ती मी बघत आहे. अडचण एवढीच आहे की रोहित पवार यांना क्रेडिट जाऊ नये. यासाठी माझे विरोधक त्यांच्या नेत्यांचे पाय धरत आहेत. हा कार्यकर्ता तिथं प्रकल्प यावा, युवा परत मतदारसंघात यावेत यासाठी प्रयत्न करत आहे आणि तो कार्यकर्ता मला त्याचं क्रेडिट जाऊ नये यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे हा विरोध थांबवा आणि अधिसुचना काढा. लोकं आता आंदोलनाला रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे हा विषय माझ्या हातात राहिला नाही. लोकांच्या हातात गेला आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसात अधिसूचना निघाली नाही तर तिथला युवा इथे येऊन आंदोलन करेल.

अजितदादा तुमच्याच सरकारचे मंत्री, त्यांना भेटला का? पडळकरांनी स्पष्टच सांगून टाकलं

राम शिंदे यांच्या भाषणात नीरव मोदी यांनी जमीन घेतल्याचा उल्लेख आला. पण नीरव मोदी आता बाहेर गेले आहेत. घेतल्या असतील तर तुम्ही बघा, खोलात जावा. पण आधी अधिसूचना तर निघू द्या. टप्प्याटप्प्याने पुढे तर जाऊ अशी विनंतीही रोहित पवार यांनी राम शिंदे यांना केली. सोबतच अधिवेशनात तुम्हाला वरच्या सभागृहात बोलण्याची संधी दिली आणि त्याच तुम्ही वेगळं राजकारण करण्याचा प्रयत्न करत असाल. धमकी दिली म्हणत असाल. मंत्र्यांना कळालं ना मी त्यांना कशी धमकी दिली. मी लोकशाही मार्गानं धमकी दिली. ते समजूतदार आहेत तेवढे, माझे विरोधक तेवढे समजूतदार नाहीत, त्यात माझी काय चुक, असा टोलाही पवार यांनी शिंदेंना लगावला.

राम शिंदे काय म्हणाले?

आज विधान परिषदेत बोलताना राम शिंदे यांनी कर्जत येथील एमआयडीसी होणाऱ्या ठिकाणी नीरव मोदी याची जमीन आहे असा दावा करत मोठी खळबळ उडवून दिली आहे. ते म्हणाले, कर्जत येथे होणाऱ्या एमआयडीसीचा विषय मी अनेकदा याआधीही मांडलेला आहे. मतदारसंघातील शेतकऱ्यांना, युवकांना रोजगार मिळावा अशीच माझी पहिल्यापासूनची भूमिका असून, लवकरात लवकर एमआयडीसीची अधिसूचना निघावी. पण नेमकी कोणासाठी एमआयडीसी होणार आहे असा प्रश्न सध्या पडल्याशिवाय राहत नाही.

रोहित पवार यांचं नाव न घेता राम शिंदे म्हणाले, एमआयडीसी मतदारसंघात व्हावी, ही मागणी रास्त आहे, मात्र कोणत्या एका विशिष्ट जागी व्हावी अशी मागणी करणं हा काय प्रकार आहे? कर्जत तालुक्यात गरीब शेतकरी आहेत. पण कवडीमोल भावाने त्या जमिनी गुंतवणूकदारांनी विकत घेतल्या आहेत. खंडाळा आणि पाटेगाव येथे नीरव दीपक मोदी, मनिषा अण्णा काचोले, नयन गणेश अग्रवाल, कमलेश रतीलाल शहा, पंकज विनोद खन्ना, गणेश अग्रवाल यांच्या जमिनी आहेत. हे शेतकरी नेमके कोण आहेत? याची चौकशी होणं गरजेचं असल्याचं राम शिंदे म्हणाले.

Tags

follow us