Download App

अध्यक्षांनी फटकरालं, अजितदादांनी झापलं, सामंतांनी समजावलं : रोहित पवारांचं उपोषण मागे

मुंबई : एमआयडीसीच्या प्रश्नावरुन उपोषणाला बसलेल्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आंदोनल मागे घेतलं आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कडक शब्दांत फटकराल्यानंतर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी झापल्यानंतर आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी समजूत काढल्यानंतर आमदार पवार यांनी त्यांचं उपोषण मागे घेतलं आहे. दबावाच्या राजकारणाला बळी पडून माझ्या मतदारसंघातील MIDC चा प्रश्न आश्वासन देऊनही सरकार मार्गी लावत नाही, असा आरोप करत रोहित पवार उपोषणाला बसले होते. (NCP MLA Rohit Pawar withdrawn hunger strike over the MIDC issue)

काय म्हणाले विधानसभा अध्यक्ष?

आमदार रोहित पवार उपोषणाला बसले असल्याचं राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं. आपल्या सदनाचे सदस्य रोहित पवार बाहेर पावसात पाटेगाव आणि खंडाळा तालुका कर्जत येथील एमआयडीसीसाठी उपोषणाला बसले आहेत. गत अधिवेशनात त्यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून लक्ष वेधलं होतं. त्यावर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी अधिवेशन संपायच्या आधी आदेश काढू असं सांगितलं. मात्र दुसरे अधिवेशन आले तरी अजून त्याबाबत निर्णय झालेला नाही. त्याची शासनाने दखल घ्यावी, अशी विनंती देशमुख यांनी केली.

MIDC प्रश्नासाठी रोहित पवार आक्रमक; विधिमंडळाबाहेर उपोषणाला अन् सरकारचा निषेध

यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधिमंडळाबाहेरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर पायऱ्यांवर आंदोलन झालेलं तेव्हा एकमताने पुन्हा असे उपोषण किंवा आंदोलन न करण्याचा आणि त्या पायऱ्यांची पावित्र्यता राखण्याबाबत निर्णय झाला असल्याचं लक्षात आणून दिलं. त्यामुळे त्याठिकाणी कोणीही उपोषणाला किंवा आंदोलनाला बसणं अयोग्य असल्याचं म्हणत रोहित पवार यांना कडक शब्दांमध्ये सुनावलं. तसंच त्यांनी सभागृहात येऊन आपलं म्हणणं मांडावं असं, आवाहन केलं.

अजित पवार काय म्हणाले?

अनिल देशमुख यांनी मांडलेल्या मुद्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही भाष्य केलं. ते म्हणाले, 1 जुलै 2023 रोजी उदय सामंत यांनी रोहित पवार यांना पत्र दिलं होतं, हे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलं. यात उदय सामंत यांनी म्हंटलं होत की, तुमचं 22 जुन रोजीचे पत्र मिळाले. यानुसार येत्या पावसाळी अधिवेशनात या एमआयडीसीसाठी बैठक घेतली जाईलं, असं त्यांनी म्हंटलं होतं. यावर अजित पवार यांनी अद्याप अधिवेशन संपायचे आहे, उद्योग विभागाचे मंत्री, एमआयडीसीचे यांनी पत्र दिलं आहे, याचा अर्थ गांभीर्याने दखल घेतली आहे, असं उपोषणाला बसण्याची गरज नसल्याचं म्हंटलं.

‘Oppenheimer’ सिनेमातील दृश्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या; अनुराग ठाकूर यांचे कठोर कारवाईचे निर्देश

रोहित पवारांचं आंदोलन मागे :

यानंतर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी रोहित पवार यांच्याशी चर्चा केली. उद्याच्या उद्या या एमआयडीसीसाठी बैठक घेतली जाईल. अधिसूचना काढण्यासाठी उद्योग विभाग सकारात्मक आहे. त्यांनी माझ्या विनंतीला मान दिला आहे, असं सामंत यांनी सांगितलं. तर रोजगाराच्या अडचणी सुटव्या म्हणून आज आंदोलन केलं. वर्षभरात अनेक वेळा उदय सामंत, CM, DCM यांना भेटून अधिसूचना काढावी यासाठी विनंती करत होतो. मागे काय झालं त्यात न जाता आज अनेक नेते येऊन भेटले. उदय सामंत साहेब यांनी येऊन उद्या बैठक घेण्याचा शब्द दिला आणि अधिवेशन संपण्या अगोदर अधिसूचना काढणार असाही शब्द दिला. महाराष्ट्राचे मंत्री म्हणून विश्वास ठेवणं ही आमची जबाबदारी आहे. मी माझं आंदोलन मागे घेत आहे, असं रोहित पवार यांनी सांगितलं.

Tags

follow us