राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे एसआयटीच्या चक्रव्यूहात?

मुक्ताईनगर : राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse)यांच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. त्याचं कारण म्हणजे मुक्ताईनगरमधील (Muktainagar)गौण खनिज प्रकरणात आता एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय महसूल विभागानं घेतलाय. महसूल विभागानं (Department of Revenue) एसआयटी (SIT)स्थापन करण्याच्या निर्णयानं एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ होणारंय. या प्रकरणात एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या पत्नी मंदा खडसे यांच्या नावानं […]

Eknath Khadse : "होय, मी भाजपात प्रवेश करणार", नाथाभाऊंनी अगदी ठासूनच सांगितलं

Eknath Khadse : "होय, मी भाजपात प्रवेश करणार", नाथाभाऊंनी अगदी ठासूनच सांगितलं

मुक्ताईनगर : राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse)यांच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. त्याचं कारण म्हणजे मुक्ताईनगरमधील (Muktainagar)गौण खनिज प्रकरणात आता एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय महसूल विभागानं घेतलाय. महसूल विभागानं (Department of Revenue) एसआयटी (SIT)स्थापन करण्याच्या निर्णयानं एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ होणारंय.

या प्रकरणात एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या पत्नी मंदा खडसे यांच्या नावानं सातोड शिवारात 33 हेक्टर 41 आर जमीनीची खरेदी केली. या जमीनीला शालेय कारणासाठी एनए (NA) करताना अनियमितता झाल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात केला.

पक्षाने कारवाई आधीही विचारलं नाही अन् नंतरही नाही, सत्यजित तांबेंनी स्पष्ट सांगितलं

गौण खनिज प्रकरणात अवैध उत्खनन करत तब्बल 400 कोटी रुपयांचा महसूल बुडवल्याचा आरोपही केला होता. या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्याची मागणी पाटील यांनी केली होती. त्यानुसार आता नाशिक (Nashik) विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन केलीय.

Exit mobile version